शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

बुढ्ढी के बाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 15:13 IST

बुढ्ढी के बाल म्हटले की, सर्वांना लहानपण आठवते. धरणगाव येथील साहित्यिक बी.एन.चौधरी यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत याच बुढ्ढी के बाल याविषयी खुमासदार शैलीत लिहिले आहे.

‘अम्मीजान.... अम्मीजान देखो तो, अपने रहीम को सामनेवाली गलीके रामने बहोत मारा. वो, रो रहा है मैदान मे...’सकिना दम लागल्यागत बोलत होती. तिची चिंता ऐकून तिची अम्मी फातिमाने हातातलं काम तसंच टाकत बाहेर धाव घेतली.आपली ओढणी सावरत सकिना मैदानाकडे निघाली. तिथे तिला रहीम रडताना दिसला. त्याचे कपडे मातीने माखले होते. चेहऱ्यावर अश्रू वाहून थिजले होते. फातिमाने रहिमला बखोटीला धरुन तरातरा ओढत घराकडे आणले.‘कितनी बार कहा तुझे, साथ मे खेलते हो... तो लडना झगडना नही. पर तुम हो के मानतेही नही.’ फातिमा त्रासिक मुद्रेने रहिमकडे पहात म्हणाली.‘अम्मीजान, हम कहा लडझगड रहे थे. बस, थोडीसी खिंचातानी हो गई रामसे.’ हिला कोणी सांगितलं, आमचं भांडण झालंय ते? या असमंजस्याने तो अम्मीकडे पहात तिच्यासोबत फरफटला जात होता.बघता बघता बातमी वाऱ्यासारखी मोहल्ल्यात पसरली.रहिमचा अब्बू रागारागात त्याच्या दोनचार साथीदारांना घेऊन रामच्या घराकडे निघाला.‘आज सबक सिखानाही पडेगा हरामके पिल्ले को.’त्याचा त्वेष पहाता त्याच्या सोबत्यांची गर्दी वाढली.प्रत्येकाच्या हातात लाठी, काठी, सळई, दगड, विटा काहीतरी होतेच आणि डोक्यात होता विद्वेष. क्षणात मोहल्ल्याचा माहोल बदलला.साऱ्यांनी रामाचे घर गाठले. ‘कहा है वो हरामी? अब उसकी खैर नही. अब ना सहेंगे?’ सलीम थरथर करत होता. हा सगळा गलका ऐकत फातिमा रहिमला तसाच सोडत मोहल्ल्यात पळाली. ती सलीमचा स्वभाव जाणून होती. ती पोहचली तोपर्यंत सलीम रामच्या बाबांना भिडला होता. काही समजून घेण्यापूर्वी सलीमने केलेली अरेरावी, शिवीगाळ याने महिपतीला चेव चढला. तोही सलीमवर तुटून पडला. सोबत आलेले व गल्लीतलेही एकमेकांना भिडले. अनेकांची डोकी फुटली. झोपड्यांची नासधूस झाली. एकच कोलाहल माजला.गर्दीतल्याच कुणीतरी फोन करून पोलिसांना बोलावले. सायरन वाजवत त्यांची गाडी आली; तसे सारे भानावर आले. त्यांनी अनेकांना ताब्यात घेतले. तशाही अवस्थेत सलीमने रामला बाहेर काढायची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी सारे घर धुंडाळले. घरात राम नव्हताच.‘साहेब तो घरातच नाही.’हेच सांगतोय मी मघापासून. माझं कुणीच ऐकत नाही. महिपती जीव तोडून सांगत होता.पोलीस म्हणाले, ‘रहिम तरी कुठंय?’त्याच्या अम्मीनं घराकडे बोट दाखविले. पोलीस आता त्याच्या घराकडे निघाले. त्यांच्यामागे तुफान गर्दी. हिंदू-मुस्लीम आणि सारे. रहिमही घरात नव्हता. अम्मी बाहेर गेली, ही संधी साधून त्याने बाहेर धूम ठोकली होती. ठेल्यावर बसलेल्या एका वृद्धाने मैदानाकडे बोट दाखवत तो तिकडे गेल्याचे सांगितले. सारे पुन्हा मैदानाकडे धावले. एका हाताने सायकल सांभाळत दुसºया हातातील घंटी वाजवत बोलत होता...बुढ्ढीके बाल, बुढ्ढीके बाल,चार आनेके बुढ्ढीके बाल.मेल मिलाये, भेद मिटाये,दोस्त बनाये बुढ्ढीके बाल !-बी.एन.चौधरी, धरणगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यDharangaonधरणगाव