Old carrying 3 acres of farmland | पुराने वाहून नेली १०० एकर शेतजमीन
पुराने वाहून नेली १०० एकर शेतजमीन

पहूर, ता. जामनेर : महसूल मंडळ परीसरात पावसाने कहर केला. गोगडी नदीला आलेल्या महापूरात नदीकाठाच्या दूतर्फा तब्बल शंभर एकर क्षेत्रावरील उभ्या पिकांसहित शेती वाहून गेली आहे. तर अन्य शिवारातील कपाशी, सोयाबीन पिके आजही पाण्यात असल्याने कापूस वेचणीही होणार नाही. मका, ज्वारी कणसे सडून गेले आहे. त्यामुळे कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अशा स्थितीत बांधावर बसून पिकांकडे पाहून रडण्यापलीकडे शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने शासनाच्या मदतीकडे लक्ष लागले आहे.
गेल्या आठवड्यत झालेल्या अवकाळी पावसामुळे पहूर आणि परिसरातील पंचवीस खेड्यातील शेतकºयांवर आसमानी संकट कोसाळले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तेलही गेले.. तूपही गेले..
हाती धुपटणे आले ..
शेरी येथील रहिवासी मधुकर पांडुरंग बनकर हे भुमीहीन शेतकरी असून त्यांनी शेंगोळा शिवारात जमीन भाडेपट्टयाने केली आहे. मात्र तीन एकर जमिनीत मका सडून कणसांना कोंब आले आहे. कपाशीत पाणी असल्याने कापूस वेचणी करता येत नाही. बारा ते पंधरा एकर जमीनतील जवळपास पंधरा लाखांचे उत्पन्न पाण्यात गेले आहे. सध्या उत्पन्न तर सोडाच पण शेतीला लागलेला खर्चही निघणे अवघड आहे. त्यामुळे तेलही गेले.. तूपही गेले...हाती धुपाटणे आले अशी अवस्था शेतकºयांची झाली आहे.
अनेकांची शेती वाहिली
गोगडी धरणाच्या जवळून खचार्णा पर्यंत वाहणाºया गोगडी नदीला गेल्या शनिवारी महापूर आला.यात नदीच्या दुतर्फा शंभर एकर क्षेत्रातील जमीनी सहित वाहून गेले आहे. युवराज पंडीत बनकर यांच्या साडेतीन एकर जमीनीतील कपाशी, मिरची,गिलके वाहून गेले आहे. ठिबकसंचही वाहून गेला. जमीन नदीपात्रासारखी दिसून येत आहे. याच काठावरील ओंकार पंडीत बनकर, नितीन रघुनाथ वारूळे अशा सत्तर शेतकºयांची जमीन पिकांसह वाहून गेली. शिवनगरशिवारातील एकनाथ संपत करंवदे यांचे वीस एकर क्षेत्रात कपाशी, सोयाबीन ,मिरची,गिलके पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन सडल्याच्या अवस्थेत दिसून येत आहे. मिरची,गिलके नष्ट झाली आहे.
सात हजार शेतकºयांच्या
शेतातील नुकसानीचे पंचनामे
पहूर मंडळातील १७ गावात १३ हजार ४६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र असून १० हजार १०५ शेतकरी आहेत.पैकी ७ हजार २३७ शेतकºयांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे केले आहेत. राहिलेले पंचनामेही पूर्ण होत आले आहे. साडेतीन हजार हेक्टरवर मका तर १८ हजार ५०० हेक्टर कपाशी लागवड झाली आहे. तलाठी, ग्रामसेवक, क्रुषी साहाय्यक यांच्या माध्यमातून नुकसानबाधित क्षेत्रांचचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे मंडळ अधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरूण शेवाळे यांनी पाहणी करण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.


Web Title: Old carrying 3 acres of farmland
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.