अमळनेर : मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे सर्वच हादरले. कामानिमित्त मोठी माणसं तरी बाहेर निघालीत, परंतु शाळेत जाणारी सर्व मुलं घरात कोंडली गेली. ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. सुरुवातीला ऑनलाईन शिक्षणाची क्रेझ वाढत गेली. आता मुलं आणि पालकही त्या ऑनलाईन शिक्षणाला कंटाळले. यामुळे एका विद्यार्थिनीने चक्क शाळेलाच पत्र लिहून ह्यहे ईश्वरा... शाळा लवकर सुरू होऊ दे,ह्ण अशी विनवणी केली आहे.सात-आठ महिने उलटूनही शाळा उघडत नाहीत म्हणून सेंट मेरी हायस्कूलमध्ये सातवीत शिकणारी मनस्वी सुरेंद्र बोरसे ह्या विद्यार्थिनीने शाळेची आठवण येत आहे म्हणून शाळेला चक्क पत्रच पाठवले. त्यात तिने सर्व स्टॉफची आठवण काढत सर्वांना काळजी घेण्याबाबत आग्रह धरून शाळा लवकरात लवकर उघडून आम्हा साऱ्या मुलांची धम्माल पुन्हा सुरु होण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली.बालकांचे जीवन शाळेत आकार घेत असते. गुरुजन मंडळी या बालकांना विविध पैलू पाडत असतात. त्यानुसार प्रत्येक मूल घडत असते. शाळेत जाणे, प्रार्थना, परिपाठ, विविध विषयांचे तास, मैदानावरचे खेळ, मित्रांच्या गप्पा, मस्ती, शिस्त, विविध कार्यक्रमांद्वारे विकसित होणारे कलागुण, स्पर्धा, गृहपाठ यातून शारीरिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासाकडे मूल जात असते. मनस्वीने शाळेला पाठवलेले हे पत्र संपूर्ण शाळकरी मुलांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे आहे, असे शाळेच्या प्राचार्यानी सांगितले.
हे ईश्वरा, शाळा लवकर सुरू होऊ दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 21:29 IST
एका विद्यार्थिनीने चक्क शाळेलाच पत्र लिहून ह्यहे ईश्वरा... शाळा लवकर सुरू होऊ दे,ह्ण अशी विनवणी केली आहे.
हे ईश्वरा, शाळा लवकर सुरू होऊ दे
ठळक मुद्देशाळेच्या आठवणीने मुलं झाली व्याकूळसातवीची विद्यार्थिनी मनस्वी बोरसेने लिहिले शाळेला पत्र