शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

संततधारेने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:14 IST

बाजारपेठेत शुकशुकाट : चहूकडे पाणीच पाणी

जळगाव : गेल्या दोन आठवड्यांपासून सलग सुरू असलेल्या व आता तर तीन दिवसांपासून थोडाही खंड न घेता सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील वेगवेगळ््या भागात पाण्याचा निचरा होत नसल्याने तसेच चिखल अधिकच वाढत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच रहिवाशांचे हाल होत आहेत.यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने सर्वच जण चिंतेत होते. त्यानंतर मात्र जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस चांगलाच वाढत गेला. दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट स्थिती झाली आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शुक्रवारी रात्रीपर्यंत सलग सुरूच असल्याने त्याचा जवजीवनावर मोठा परिणाम झाला आहे.जोरदार पावसामुळे नवीपेठ, जिल्हा क्रीडा संकुलनजीक पाणी साचत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले की हे पाणी कमी होते, मात्र पुन्हा जोरदार पाऊस झाला की पुन्हा पाणी साचते. त्यामुळे तीन दिवसांपासून वाहन धारकांना आपली वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. या सोबतच जिल्हा रुग्णालयासमोर, श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान, बालगंधर्व नाट्यगृह इत्याही भागातही असेच अनुभव येत आहे. - जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले जात आहे तर रिपरिप पावसामुळे कॉलनी भागात चिखलच चिखल होत आहे.-शहरात अनेक ठिकाणी एकमेकांना जोडणाऱ्या दोन भागांचा रस्ता वाहून गेल्याने तर काही ठिकाणी पाईप वाहून गेल्याने रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर असल्याने विद्यार्थ्यांना ते धोकेदायक ठरत आहे. अनेक भागात घरांच्या आजूबाजूला पाणी साचले आहे. त्यामुळे रहिवाशी भयभीत झाले आहेत.रोजगार झाला ठप्प भाजीपाला महागलाजळगाव : पावसाने गेल्या दोन दिवसात थोडा वेळही उसंत न घेतल्याने जळगावातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे़ संपूर्ण शहरात सर्वत्र पाणी साचल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत़ शहरातील झोपडपट्टी भागात परिस्थिती भयावह झाली आहे़ नागरिक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारपेठा मंदावल्या आहेत़ हातमजूरी करणाऱ्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ रस्त्यांची वाट लागल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे़ अनेक भागात मोठे पाणी साचले आहे़ जनजीवन सुरळीत होण्यासाठी पावसाने काही काळ उघडीप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ सततच्या पावसामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या समस्या जाणवणार असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे़ गुरूवारी रात्री मुसळधार कोसळल्यानंतर शुक्रवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ जीवन जगण्याशी निगडीत अनेक बाबींवर या पावसामुळे विपरीत परिणाम जाणवायला लागला आहे़ भाजीपाला महागला आहे तर अनेक छोटे मोठ व्यवसाय ठप्प झाले आहेत़ अनेक भागांमध्ये गुडघ्याऐवढे पाणी साचल्याने रस्ते बंद झालेले आहेत़२४ तास आपत्कालीन व्यवस्था तैनात ठेवण्याच्या सूचनाजळगाव : आठवड्याभरापासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील सर्वच नाले भरून वाहत आहेत. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, आपत्कलीन परिस्थिती उद्भवल्यास २४ तास मनपा कर्मचाºयांनी तैनात राहण्याचा सूचना उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आपात्कलीन विभागाला दिल्या़शुक्रवारी उपमहापौरांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत बारी, नगरसेवक धीरज सोनवणे यांच्यासह आपत्कलीन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अनेक भागातील गटारी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून, मोठे नाले व उपनाले देखील भरले आहेत. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, अशा भागांमध्ये जावून पाहणी करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव