शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओडीएची पाईपलाइन फुटली,  लाखो लीटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 16:43 IST

बोदवड तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.

ठळक मुद्देनाडगाव व बोदवड येथील घटनाएकीकडे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांवर नवीन संकटजीर्ण पाईपपाईन फुटण्याचे सत्र महिनाभरापासून सुरूचनवीन पाईपलाईनच्या कामाला गती देणे गरजेचे

बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. जेसीबीच्या सहाय्याने खोदत असताना दोन ठिकाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या. पहिली घटना शहरातील मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथील प्रतिभाताई पाटील नगरजवळ १३ रोजी पहाटे दोनच्या सुमारास, तर दुसरी घटना सकाळी सातला बोदवड शहातील जुन्या तहसीलजवळ घडली.सद्य:स्थितीत ओडीएची पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सध्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे खोदत असताना ओडीएच्या जीर्ण पाईपलाईनला जेसीबी यंत्रणा धक्का लागला आणि जीर्ण पाईपलाईन फुटली. मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथे सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. परिणामी पहाटेपासून तर दुपारपर्यंत हजारो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी झाली. ही जीर्ण पाईपलाईन सोमवारी दुपारी दोन-अडीचच्या सुमारास जोडण्यात ओडीएच्या कर्मचाऱ्यांना यश आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहणे थांबले.दरम्यान, पहाटे नाडगाव येथील पाईपलाईन फुटल्यानंतर काही वेळातच बोदवड शहरातील जुन्या तहसील भागातही ओडीएची जीर्ण पाईपलाईन फुटली. येथूनही हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. सायंकाळपर्यंत ही पाईपलाईन जोडली गेली नव्हती. या पाईपपाईनमधूनही कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहणे सुरूच होेता. यामुळे वाहते पाणी पूर्ण दुय्यम निबधक कार्यालय, तलाठी कार्यालयापर्यंत वाहत होते.बोदवड शहरात गेल्या १५ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा झालेला आहे. ओडीएचे पाणी येण्याचा आज वार होता. परंतु नेमकी पाईपलाईन फुटल्याने बोदवडकरांना पाणी मिळालेच नाही. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याचे सत्र सुरूच आहे. अशा परिस्थितीत नवीन पाईप तयार करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड