शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

वेध ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’चे.... नववर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:30 IST

लगबग थर्टी फर्स्टची

जळगाव : मावळत्या वर्षाच्या शेवटचा दिवस उगवताच नवीन वर्ष व या शतकातील अनोख्या ‘टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी’ (२०२०) वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत असून ‘थर्टी फर्स्ट’साठी शहरात हॉटेलचालकांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या ‘सेलीब्रिटीं’ची बैठक व्यवस्था, वाढीव मद्य, खाद्य पदार्थांचा साठा, रोशणाई, संगीत व्यवस्थेसह आणखी काही वेगळे देण्यासाठी हॉटेलमालकांच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. या सोबतच गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला संगीतावर ठेका धरत एक-एक ‘घोट’ रिचवताना एक प्याला व त्यानंतर होणारे ‘खंबे’ यासाठी हॉटेलचालकांकडून येणाºया ‘या’ ग्राहकांची सोय ठेवली जाते. दुसरी विशेष बाब म्हणजे अनेक हॉटेलचालक मद्यपींना प्रवेश न देता कुटुंबियांसह येणाºया ग्राहकांचीही काळजी घेत असल्याचे चित्र आहे. या दोन्ही तयारी जवळपास पूर्ण झाल्या आहेत.दोन वेगवेगळ््या सेवाशहरातील काही लॉन व हॉटेलमध्ये ‘थर्टी फर्स्ट’ला दोन वेगवेगळ््या सेवेची तयारी केली जात आहे. लॉनवर खास ‘फॅमिली प्रोग्राम’ आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी मद्य तर राहणारच नाही शिवाय मद्यपीला प्रवेशही नाही. तेथे शाकाहारी जेवण, डि.जे., संगीत व्यवस्थेसह किडस् व कपल शोचेही आयोजन केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात महिला व सर्वांचीच सुरक्षितता महत्त्वाची असल्याने हॉटेलचे वाढीव सुरक्षा रक्षकही तैनात राहणार आहेत. जवळपास ५०० जणांची व्यवस्था असलेल्या ठिकाणी ४० ते ४५ वेगवेगळे खाद्य पदार्थ चाखता येणार आहेत. येथे प्रवेशासाठी आरक्षणाचीही (बुकींग) व्यवस्था करण्यात आली. याव्यतिरीक्त हॉटेलच्या नियमित उपहारगृहात मद्यासह शाकाहारी व मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था आहे.काही हॉटेलमध्ये केवळ शाकाहारी जेवण मिळत असले तरी दरवर्षी गर्दी होणाºया शाकाहारी हॉटेलमध्येही तयारी करण्यात आली आहे. येथे खास थर्टी फर्स्टसाठी गार्डन तयार करण्यात आले आहे. वातानुकुलीत, साधे (नॉन एसी), गार्डनची व्यवस्थादेखील आहे. हॉटेलमध्ये ‘न्यू ईअर स्पेशल मेनूंची’ विविध रेंज ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याशिवाय येथे वाढीव बैठक व्यवस्थाही करण्यात येत आहे.जळगावकरांना उच्च प्रतीचे जेवण देण्याचा मानस हॉटेल चालकांनी व्यक्त केला असून येथे ‘फॅमिली’ची व्यवस्था आहे. याव्यतिरीक्त शहरातील व शहरालगतच्या हॉटेल्स, बार, परमीटरुमवर केवळ वाढीव बैठक व्यवस्था, मद्यासह खाद्य पदार्थांचा वाढीव साठा, रोशणाई यासाठी लगबग सुरू आहे.रोशणाईने उजळून निघणार हॉटेल्सथर्टी फर्स्टसाठी काही ठराविक हॉटेल्स विशेष व्यवस्था करीत असल्या तरी त्यांच्यासह सर्वच हॉटेल, बार, परमीट रुमवर रोशणाई केली जात आहे. ३० डिसेंबर पासून याला वेग येणार आहे.‘थर्टी फर्स्ट’साठी काही खास मेनूंचे नियोजन- काही हॉटेल चालकमध्ये ५०० विविध पदार्थांची मेजवानी राहणार आहे. यात पनीर तुफानी, पनीर मुसल्लम, चिकन अंगारा, चिकन रेश्मी यांचा समावेश राहणार आहे.- काही ठिकाणी तब्बल तीन दिवस म्हणजे ३०, ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी ‘न्यू ईअर स्पेशल मेनू’मध्ये पंजाबी, कॉण्टीनेण्टल, साऊथ इंडियन, चायनीज पदार्थ ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहे.- अनेक हॉटेल चालकांनी शाकाहारी पदार्थांची वेगळी व्यवस्था केली असून त्यात ४० ते ४५ मेनू उपलब्ध करू दिले जाणार आहेत. तसेच मांसाहारीमध्येही विविध पदार्थ राहणार आहेत.अनेकांकडून घरीच शाकाहारी मेनूची तयारीनवीन वर्षाच्या स्वागत प्रसंगी अर्थात ‘थर्टी फस्ट’ साजरा करताना अनेक जण मद्यासह मांसाहारी पदार्थांना पसंती देतात. मात्र यंदा नेमके ‘थर्टी फस्ट’ला मंगळवार आल्याने या दिवशी अनेकांचा उपवास असतो. त्यामुळे ‘थर्टी फस्ट’ला अनेकांचा शाकाहारावर भर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक हॉटेल चालकांनी तशी व्यवस्थाही केली आहे. काही जणांनी तर घरीच तर काही कुटुंब एकत्र येऊन घराच्या गच्चीवर गुलाबी थंडीत पाव-भाजी, भरीत-पुºया, खिचडी-कढी असा शाकाहारी मेन्यूचा बेत आखत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव