चोपडा : ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले. राज्य व केंद्र सरकार आरक्षण देण्यात टाळाटाळ करत आहे. आरक्षण आपल्या हक्काचे, असून ते मिळविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी २५ रोजी जळगाव येथे होणाऱ्या ओबीसी परिषदेसाठी मोठ्या प्रमाणात हजर रहा, असे आवाहन लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी येथे केले.
त्या येथे ओबीसी परिषदेच्या तयारीच्या बैठकीत बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या इंदिराताई पाटील होत्या.
बैठकीस जळगावचे संजय पवार, करीम सालार, विष्णू भंगाळे तसेच डॉ. सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिंदे, विठ्ठलराव पाटील, धनंजय पाटील, प्रमोद बोरसे, रमाकांत सोनवणे, सोहन सोनवणे, अहमद कुरेशी, रईस शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष मनोज पाटील, डॉ. विजय पाटील, राजेंद्र कोळी, भूषण पाटील, गोपाल सोनवणे, ताराचंद बाजूला, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकरराव देशमुख, शिक्षक भारतीचे तालुका अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.