शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर, पुण्यापेक्षा जळगावातील पोषण आहार मसाला दुपटीने महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 11:53 IST

विद्यार्थ्यांऐवजी पुरवठादाराचेच 'पोषण'

जळगाव : शालेय पोषण आहारात वापरल्या जाणाऱ्या धान्यादी मालाचे दर हे पुणे, नागपूर येथील दरांच्या तुलनेतही तब्बल दुपटीने अधिक असल्याचे समोर आले आहे़ पुरवठादाराकडून पुरविण्यात येणाºया या मालाचे दर गगनाला भिडणारे असताना त्याच्या गुणवत्तेवर मात्र अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून तक्रारदार रवींद्र शिंदे यांनी शाळेत वापरला जाणारा हा धान्यादी माल मंगळवारी जिल्हा परिषदेत आणला होता़ या प्रकारातून पुरवठादार व यंत्रणेचेच पोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे़शालेय पोषण आहारात लागणाºया धान्यादी माल पुरविण्यासंदर्भात गुनिना कमर्शियल व शासनात फेब्रुवारी २०१९ मध्ये करार करण्यात आलेला आहे़ यात हे सर्व दर देण्यात आले आहे़ बाजारात तेजी-मंदी कुठलीही परिस्थिती असताना दर कमी असतानाही हे दर मात्र, त्याच दराने महिने टू महिने सुरू आहे़ गुनिना कमर्शियल यांचे स्वत:चे हे प्रोडक्ट असून त्याचा पुरवठा शाळांना करण्यात येतो़जिल्हाभरातील २७०० शाळांना हा पुरवठा केला जातो़ याचे दोन महिन्याचे बिल साडे तीन ते चार कोटींच्या घरात असते़ बाजारातील दरांपेक्षा या मालातील अनेक मालाचे दर हे तब्बल दुपटीने अधिक आहेत़ त्या मानाने गुणवत्ता नसल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत़ अशा स्थितीत शासन स्तरावरून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे़ वारंवार हा मुद्दा मांडूनही दुर्लक्ष होत असल्याने यात तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी हा धान्यादी माल मंगळवारी जिल्हा परिषदेत पाहण्यासाठी आणलेला होता़सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मालाची गुणवत्ता व दरातील तफावत हे मुद्दे ते मांडणार होते़ मात्र, सीईओ डॉ़ पाटील हे अन्य कार्यक्रमांमध्ये असल्याने भेट होऊ शकली नाही, मात्र, जिल्हा परिषदेत काही सदस्यांनी हा विषय समजून घेतला असून आगामी सभामध्ये याबाबत जाब विचारू असे आश्वासन त्यांनी दिले आहे़सदस्या पल्लवी सावकारे यांनी याबाबत अनेक सर्वसाधरण सभामध्ये शिक्षण विभागाला धारेवरही धरले होते़ अनेक फाईल वर्षानुवर्षे प्रलंबित राहातात, पोषण आहाराच्या बिलांची फाईल मात्र, तत्काळ कशी मार्गी लागते या विषयावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते़दरम्यान, या धान्यादी मालात असलेल्या कांदा-लसूण मसाल्याच्या गुणवत्तेवर अधिकच प्रश्न उपस्थित केले जात आहे़ ही पेस्ट किती दिवस वापरासाठी चांगली असते, किती दिवसात ती वापरली जाते? यासह अनेक ठिकाणी या पेस्टला बुरशी लागून जाते, अशा अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत़पोषण आहाराच्या पुरवठ्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जात असून आता तरी शासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे शोषण व पुरवठादाराचे पोषण थांबवावे अशी मागणी होत आहे़माल न घेता देयके दिल्या प्रकरणी पडताळणी करून कारवाईसाई मल्टिसर्व्हीसेस या पोषण आहार पुरवठादाराला १ लाख ६७ हजारांची देयके माल न घेता अदा करण्यात आली होती़ या प्रकरणात सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी चार महिन्यापूर्वी संचालक स्तरावर कारवाई संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे़ या प्रस्तावाची पडताळणी करून योग्य ती कारवाई करू अशी माहिती शिक्षण संचालक प्राथमिक द़ गो़ जगताप यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली़ धान्यादी माल व देयकांबाबत शिक्षणाधिकारी व सीईओंना त्या-त्या पातळीवर अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले़हे स्पर्धात्मक दर असतात, त्या- त्यावेळच्या मार्केटच्या परिस्थितीनुसार काही कमी काही जास्त असे ते दर असतात शिवाय निविदा प्रक्रिया ही पारदर्शकपणे होते़ त्यामुळे त्यावेळच्या मार्केटच्या परिस्थितीवर हे दर अवलंबून असतात- द़ गो़ जगताप, शिक्षण संचालक, प्राथमिकएकीकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही व शालेय पोषण आहार या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत विषयात विद्यार्थ्यांचे सोडून पुरवठादाराचे पोषण सुरू असल्याचा हा प्रकार आहे़ दर दुप्पट असतानाही मालाच्या गुणवत्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. - रवींद्र शिंदे,माहिती अधिकार कार्यकर्ते

टॅग्स :Jalgaonजळगाव