शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
2
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
3
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?
4
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
5
या स्वस्त सात सीटर कारला मिळाले फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग; मारुती अर्टिगापेक्षा खूपच सुरक्षित, भारत एनकॅपमध्ये चाचणी...
6
ईव्हीचा 'सायलेंट धोका' संपणार! इलेक्ट्रिक वाहनांसाठी AVAS ध्वनी प्रणाली अनिवार्य होणार? काय आहे प्रकार?
7
मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले
8
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निफ्टी ८० अंकांनी वधारला, मेटल-आयटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी
10
October Baby Astro: कसे असतात ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेले लोक? स्वभाव, गुण, दोष; सगळंच जाणून घ्या
11
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
12
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
14
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
15
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
16
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
17
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
18
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
19
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
20
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?

आतापासूनच दुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 21:28 IST

विजयकुमार सैतवाल कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या ...

विजयकुमार सैतवालकमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने आॅक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या असल्याचे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले आहे.यंदा जिल्ह्यात ७० टक्केही पाऊन न झाल्याने शेतकरी चिंतीत आहेत. कमी पावसामुळे खरीप हंगामावर परिणाम झाला तर आहेच, सोबतच रब्बीवरही दुष्काळी सावट आहे. त्यामुळे बाजारपेठेत आतापासूनच गव्हाचे भाव वाढले आहेत. सोबतच नवीन कडधान्य येत असले तरी डाळींचे भाव कमी न झाल्याने महागाईच्या चटक्याचे संकेत आतापासूनच मिळत आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत जळगाव शहरातील बाजारात मोठी उलाढाल झाली असली तरी डाळींचे दर स्थिर आहेत. तर एकीकडे गव्हाच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १०० रुपयांची वाढ झाली आहे. अनेक ग्राहक आपल्या घरात सहा महिन्यांसाठी धान्य जमा करून ठेवतात. त्यामुळे सध्या गव्हाला मागणी वाढली असल्याचे चित्र आहे.सध्या बाजारात गव्हाची आवक अत्यल्प आहे. मध्यप्रदेशातून पाच ट्रक माल गव्हाची आवक शहरात होत आहे. मात्र, मागणी खूप आहे. गेल्या आठवड्यात १४७ या जातीच्या गव्हाचे भाव प्रतिक्विंटल २४०० इतके होते. तर सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव गव्हाला आहे. तर लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० वरून २४५० पर्यंत वाढले आहेत. दिवाळीसाठी रवा, मैदा तयार करण्यासाठी गव्हाला अधिक मागणी राहणार आहे.डाळींच्या दरात फारशी वाढ किंवा घट झाली नसून गुणवत्ता पाहून सध्या उडीद व मुगाला भाव ठरविला जात आहे. गेल्या आठवड्यात मूग डाळींचे भाव ६४०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल इतके होते. सध्या हेच भाव असून, चांगल्या दर्जाच्या मुगाच्या डाळीला ६८०० ते ७००० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. उडदाच्या भावात शंभर रुपयांची घसरण झाली असली तरी चांगल्या दर्जाच्या मालाला भाव चांगला आहे. बाजार समितीमध्ये या आठवड्यात मुगाची आवक झालीच नाही. एकाही शेतकऱ्याने बाजार समितीत माल विक्रीसाठी आणला नसल्याचे चित्र आहे. तर उडदाची आवकदेखील या आठवड्यात केवळ ११३ क्विंटल इतकीच झाली आहे.गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच खरेदी केंद्र सुरू होईल या अपेक्षेने शेतकº्यांनी खासगी व्यापाºयांना माल देणे थांबविले आहे. सोयाबीनच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात २९०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल या दराने सोयाबीनची विक्री होत आहे. मात्र, बाजारात सोयाबीनची आवकदेखील खूप कमी आहे. सध्या बाजार समितीमध्ये २४५ क्ंिवटल सोयाबीनची आवक झाली आहे.गेल्या आठवड्याच्या तुलनेत तांदळाच्या दरातदेखील कोणतीही घट किंवा वाढ झालेली नाही. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल ५० रुपयांची तर हरभरा डाळीत १०० रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर इतर धान्याची आवकदेखील बाजारत बºयापैकी आहे. ज्वारीचे सध्याचे दर १४०० ते १५६० इतके आहेत. दादार २१०० ते २१२५ इतक्या दराने खरेदी केली जात आहे. दरम्यान, एकीकडे शासकीय हमीदराने शेतमालाची खरेदी करावी, असे आदेश शासनाचे असताना दुसरीकडे मात्र काही व्यापारी या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवीत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव