शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

आता आचारसंहितेचा ‘बहाना’..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:24 IST

समांतर रस्त्याचा विषय पुन्हा बासनात : आंदोलन करणा:या शहरातील सामाजिक संस्थाही झाल्या शांत

जळगाव : शहरातून जाणा:या राष्ट्रीय महागार्मावर अपघात झाल्यानंतर प्रशासनाकडून बैठक घेण्यात येते, त्यात कारवाईचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नाही. प्रशासनाच्या या चालढकलमुळे महामार्गावर एकापाठोपाठ बळी जात आहे. याचे ना प्रशासनाला सोयरेसुतक आहे ना लोकप्रतिनिधींना. आता तर निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचा बहाना केला जात आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मनावर घेतले असते तर आतार्पयत महामार्गाची दैना कधीच दूर झाली असती. सर्वसामान्यांसाठी आवाज उठविणा:या सामाजिक संघटनांनीही आता शांत झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाला फावत आहे. तीन आठवडय़ांपूर्वी समांतर रस्त्यांसाठी सपाटीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते, ते सुद्धा आता थांबले आहे. साईडपट्टय़ांची दुरुस्ती फक्त डॉ.अग्रवाल चौकात करण्यात आली, त्यानंतर ती थांबली. प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्यास कारणीभूत आहे. सर्वपक्षीय   शांतगेल्या डिसेंबर महिन्यात समांतर रस्त्याच्या विषयावरून सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आले होते. जिल्हाधिका:यांकडे जाऊन तेथेही या पदाधिका:यांनी गा:हाणी मांडली, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना भेटूनही रस्त्याची निकड लक्षात आणून देण्यात आली. तर प्रशासनाविरोधात गुन्हेकाही संतप्त पदाधिका:यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले होते की, यापुढे महामार्गावर निष्पाप बळी गेल्यास संबंधीत विभागांवर गुन्हे दाखल केले जातील. हे आंदोलन आटोपल्यानंतर महामार्गावर चार ते पाच अपघात झाले मात्र कोणत्याही विभागावर गुन्हा दाखल झाला नाही वा इशारे देणा:या संस्थांचे पदाधिकारी शांत बसून असल्याचेच दिसून येत आहे. जिल्हाधिका:यांकडील बैठक निष्पळमहामार्गावरील अपघात, समांतर रस्त्यांची निकड या बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडे बैठक झाली होती. मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) चे अधिकारी यांना या बैठकीस पाचारण करण्यात आले होते. समांतर रस्त्यांबाबत मनपाने प्रस्ताव द्यावा, ना हरकत द्यावे अशी नहीच्या अधिका:यांनी भूमिका मांडली होती.तसेच महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविण्याचेही जाहीर केले होते मात्र ही बैठक होऊन आता महिना उलटला तरीही पुढील हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे झालेल्या बैठका, आंदोलने हे केवळ देखावा असल्याचेच आता लक्षात येत आहे. 4डिसेंबर महिन्यातील अपघातानंतर जिल्हाधिका:यांनी दिले होते आदेश4रस्त्याच्या सिमांकनाचे संयुक्त काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि भूमि अभिलेखा यांनी संयुक्तीपणे करावे4महामार्गावरील अतिक्रमणांबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने द्यावा अहवाल413.9 मिटरच्या शहरातून जाणा:या रस्त्याचा डीपीआर (प्रकल्प अहवाल) नही ने द्यावा4अतिक्रमणांबाबतच्या तक्रारी लक्षात घेऊन ती 10 दिवसात काढली जावीत4रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व साईड पट्टय़ांच्या कामांसाठी प्राप्त निधीतून झालेल्या कामांचा अहवाल सादर करावा4यासह समांतर रस्त्याची निकड लक्षात घेऊन त्याविषयी कार्यवाहीच्याही सूचना होत्या. जळगाव : महामार्गालगच असलेल्या समांतर रस्त्यावरील अतिक्रमणांचा विषय गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत अधिका:यांना सूचना दिल्या जाऊनही दुर्लक्षच होत आहे.महामार्गावरून रोज जवळपास 20 ते 25  हजार वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच शहरातील नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्यामुळे तेदेखील महामार्गावरूनच ये-जा करत असतात.  यावर पर्याय म्हणून जुना नशिराबाद नाका ते बांभोरी पुलार्पयत समांतर रस्त्याचे नियोजन आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुने 60 मिटरची जागा पूर्वीच नॅशनल हायवे अॅथॉरिटीने संपादीत केली आहे. जवळपास 10 किलो मिटरचा हा समांतर रस्ता प्रस्तावित आहे. त्याबाबत न्यायालयातही कामकाज झाले, आदेश दिले गेले मात्र अद्याप अंमलबजावणी नाहीच.  प्रभात चौक ते शिवकॉलनीमहामार्गावर प्रभात चौक ते शिव कॉलनी या रस्त्यावर सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. फुलांच्या कुंडय़ा तयार करणारे, थंडीचे कपडे विक्री करणारे, खाद्य पदार्थ विक्रेते, लहान, मोठय़ा टप:या या भागात टाकण्यात आल्या आहेत. बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस तर डबर, विटा, खडी, वाळू विक्री करणा:यांनी दुकानदारी सुरू केली आहे. आपले खाजगी शो रूम असल्या प्रमाणे या मंडळी येथे टप:या टाकून बसले आहेत. आकाशवाणी चौकातही समांतर रस्त्यांच्या जागेवर हॉटेल्स, टप:यांचे जाळे पसरलेले दिसते. पुढे इच्छादेवी चौक, सदोबार वेअर हाऊसच्या समोर काही   दरवाजे खिडक्या विक्रेत्यांनी जागा व्यापली आहे. अजिंठा चौफुलीवर वाहनांचे पार्किग, वाहने विक्रीची दुकाने, गॅरेज लावण्यात आले आहेत. तर कालिंका माता मंदिराच्या मागील बाजूस रस्त्यावर वॉलकंपांऊंड करून आत विक्रीची वाहने लावण्यात आली आहेत. गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांवरील ही अतिक्रमणे आहे तशीच आहेत. त्यात कमी नाही पण वाढच होत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या अतिक्रमणांना कोणीही हात न लावल्याने समांतर रस्ता गायब झाला तर महामार्गही ब:याच ठिकाणी अरूंद झाला असल्याचेच लक्षात येत असून यामुळेच अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव : समांतर रस्त्याच्या कामाला ना मनपा हात लावत ना ‘नही’ मात्र महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जैन उद्योग समुहाने पुढाकार घेत  जवळपास दोन आठवडे समांतर रस्त्यांवरील सपाटीकरणाचे काम केले, मात्र आता हे कामही बंद झाले आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात स्वच्छता अभियान राबविले होते. त्या काळात केलेल्या आवाहनानंतर जैन उद्योग समुहाने दोन जेसीबी व चार डंपर मनपास देऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात केली. अधिकारी पदाधिका:यांनी घेतली भेटमनपाचे महापौर नितीन लढ्ढा, आयुक्त जीवन सोनवणे यांनी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक    जैन यांची भेट घेऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाच्या कामास मदत करावी  म्हणून आवाहन केले होते. त्यास जैन उद्योग समुहाने प्रतिसाद देऊन समांतर रस्त्याच्या सपाटीकरणाचे काम पुन्हा सुरूही केले. मात्र आता हे काम का थांबले कुणास          ठाऊक?जळगाव : शहरातून जाणा:या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दीड महिन्यात अर्थात 45 दिवसात 9 अपघात झाले, त्यात 10 जणांचा बळी गेला आहे  तर दोन जण जखमी झाले आहेत. यातील काही बळी हे महामार्गावरील खड्डे, साईडपट्टय़ांची दैना, समांतर रस्त्याचा अभाव तर काही अवजड वाहनांच्या धडकेने झाले आहेत. वाढत्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिका:यांनी 13 डिसेंबर रोजी ‘नही’ च्या अधिका:यांची तसेच सर्वपक्षीय पदाधिका:यांची बैठक घेवून अपघातास कारणीभूत ठरणा:या अधिका:यांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसात साईड पट्टयांची दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. मात्र ना खड्डे बुजविले गेले ना साईडपट्टय़ांची दुरुस्ती झाली. सदोष मनुष्यवधाचाही गुन्हा कोणावर दाखल झाला नाही.महामार्गावरील अग्रवाल हॉस्पिटल, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप, विद्युत कॉलनी, खोटे नगर, अजिंठा चौक हे ठिकाण अत्यंत धोकादायक आहेत. शिव कॉलनी व बांभोरी पुलाजवळी कठडेही धोकादायक आहेत. तसेच महामार्गाला लागून अनेक ठिकाणी साईडपट्टय़ा अतिशय उंच आहेत. गतिरोधकही नियमात नाहीत. गेल्या आठवडय़ात शिव कॉलनी पुलाजवळून मालवाहू रिक्षा पलटी झाली होती.