शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉटस्अ‍ॅप अ‍ॅडमिनला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:12 IST

पोलिस : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा

जळगाव : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप किंवा सोशल मिडियाच्या माध्यमातून राजकीय पक्षांवर किंवा वैयक्तिक टिका टिपण्णी करू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल,अशी नोटीस पारोळा पोलीस निरीक्षकांनी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनना बजावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली असता अशी नोटीस देता येते का? ते तपासावे लागेल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पारोळा पोलिस निरीक्षकांनी रविवारी व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनना काढलेली नोटीस सोशल मिडियावरच चांगलीच व्हायरल झाली. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याचा आरोपही होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही चुकीचा मेसेज सोशल मिडियावर टाकला व त्यावरून वाद निर्माण झाल्यास संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाते. मात्र अशी व्हॉटस्अ‍ॅप गृप अ‍ॅडमिनला नोटीस देता येते का? हे तपासावे लागेल.अशी नोटीस देता येते का? कोणत्या अधिकारात दिली? हे बघावे लागेल. चुकीचे मेसेज पाठविले व त्यामुळे वाद निर्माण झाल्यास संबंधीतावर कारवाई केली जाते. मात्र अशी नोटीस द्यायची ठरविली तरी किती जणांना देणार?          -डॉ.अविनाश ढाकणे,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारीकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही नोटीस काढण्यात आली आहे. प्रत्येकाला वैयक्तिक ही नोटीस देणे शक्य नाही, म्हणून शक्य तितक्या व्हॉयस्अ‍ॅप गृपवरच ती पाठविण्यात आली आहे. संभाव्य घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून अशी नोटीस काढण्याचा पोलिसांना अधिकार आहे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव