शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदान वाटपात दिरंगाई, चार तहसीलदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:33 IST

एरंडोल, पाचोरा, भडगाव, पारोळा तहसीलदारांचा समावेश

जळगाव - जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्राप्त अनुदानाचे वितरण करण्यात दिरंगाई केल्याने चार तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा तहसीलदारांचा समावेश आहे. या चारही तहसीलदारांकडून खुलासा मागविण्यात आला असून खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. दरम्यान, या अनुदानाचे धीम्या गतीने वाटप सुरू असल्याचे वृत्तही ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ६ लाख ४१ हजार ३४५ शेतकऱ्यांचे ७ लाख १८ हजार १२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले व या नुकसानीपोटी जिल्ह्यासाठी ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत जिरायत क्षेत्रासाठी ३१७ कोटी २३ लाख २५ हजार ४९४ रूपये, ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत बागायत क्षेत्रासाठी ३०७ कोटी ७१ लाख ४४ हजार ७७५ रूपये तर ३३ टक्क्यांंपेक्षा जास्त बाधीत फळपिकांसाठी १८ कोटी ६९ लाख ८२ हजार २० रुपये अशी एकूण ६४३ कोटी ६४ लाख ५२ हजार २८९ रूपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. शासनाकडून त्यापैकी पहिला हप्ता म्हणून २८ टक्के रक्कम म्हणजेच १७९ कोटी ९८ लाख १ हजार रूपये वितरीत करण्यात आला. या प्राप्त अनुदानाचे तहसीलदारांना तातडीने वितरण करण्यात येऊन ते शेतकºयांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी अनुदान वाटपाला सुरुवात केली.या अनुदान वाटपाचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने तहसीलदारांकडून मागविला होता. अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४४ हजार ८५२ शेतकºयांना १६६ कोटी १७ लाख ८५ हजार ३३५ रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. एकूण ९२.६२ टक्के अनुदान वाटप झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.चार तालुक्यात कमी वाटपजिल्ह्यातील भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्यातील शेतकºयांना अनुदानाचे १०० टक्के वितरण करण्यात आले आहे. तर जळगाव तालुक्यात ९९.७० टक्के, जामनेर तालुक्यात ९९.९८ टक्के, धरणगाव तालुक्यात ९८.९२ टक्के, यावल तालुक्यात ९९.९९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. मात्र एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा या चार तालुक्यातील तहसीलदारांनी अनुदान वाटपात दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये एरंडोल तालुक्यात केवळ ६०.०८ टक्के अनुदानाचे वाटप झाले असून पाचोरा तालुक्यात ७४.९० टक्के, भडगाव तालुक्यात ७४.५४ टक्के, पारोळा तालुक्यात ८१.१९ टक्के अनुदानाचे वाटप झाले आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या आदेशान्वये चारही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासादेखील मागविण्यात आला आहे.अनुदान वाटपाची टक्केवारी या प्रमाणे (टक्क्यांमध्ये)- जळगाव - ९९.७०- जामनेर - ९९.९८,- एरंडोल - ६०.०८- धरणगाव - ९८.९२- भुसावळ - १००,- बोदवड - १००- मुक्ताईनगर - १००- यावल - ९९.९९- रावेर - १००- पाचोरा - ७४.९०- भडगाव - ७४.५४- पारोळा - ८१.१९- चाळीसगाव - १००- अमळनेर - १००- चोपडा - १००

टॅग्स :Jalgaonजळगाव