शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पतीच्या गैरवर्तणूकप्रकरणी नगरसेविकेला नोटीस

By admin | Updated: May 19, 2017 17:36 IST

नगरसेविका पदाधिका:यांऐवजी त्यांचे पतीच सहभागी होतात अशी परिस्थिती निर्माण

ऑनलाइन लोकमतवरणगाव, जि. जळगाव, दि. 19 - : नगरपालिका कारभारात नगरसेविका पदाधिका:यांऐवजी त्यांचे पतीच सहभागी होतात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका जागृती सुनील बढे यांना त्यांचे पती सुनील बढे यांच्या   गैरवर्तनुकीप्रकरणी नोटीस बजावली आहे. तसेच  जिल्हाधिका:यांकडे कारवाईसाठी प्रस्ताव का पाढवू नये  ? याबाबत तीन दिवसात खुलासा मागितला आहे.  सहा महिन्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांची मुदत संपत आहे. या पदावर वर्णी लागावी या हेतून पक्षातील एक सक्रीय असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या पवित्र्याने  इतर महिला सदस्यांच्या पतींनी सावध भूमिका घेतली आहे. ते  दोन दिवसापासून नगरपालिकेत फिरकलेच नाही. 2 मे रोजी  सर्वसाधारण सभेतून नगरसेविकेने सभात्याग केला. त्या बाहेर पडल्या त्यावेळी नगरसेविकेचे पती सुनील बढे यांनी नगरपालिका कार्यालयाविषयी शिवराळ भाषा वापरली. शिवाय 9 मे रोजी प्रभाग क्रमांक एकमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याप्रकरणी नगरपाकिलेवर मोर्चा आणला होता. त्यावेळी पाणीपुरवठय़ाबाबत आलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजावूनही सुनील बढे यांनी पदाधिकारी व मुख्याधिकारी यांना  शिवराळ  भाषा   वापरून   नगरपालिकेच्या प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा विभागातील  कर्मचा:यांना अरेरावीची भाषा वापरुन त्यांच्याशी वाद घातला, शिवीगाळ करून प्रशासकीय कामकाजासंदर्भात गैरवर्तन केले   असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. तीन दिवसात आपले म्हणणे मांडण्याचा नोटीसमध्ये उल्लेख आहे. माङया पतीवर गैरवर्तणुकीचे लावलेले आरोप खोटे आहेत. पाण्यासाठी आंदोलनात ते सहभागी होते. मात्र त्यांनी  कोणाबाबतही शिवराळ भाषेचा वापर केला नाही. याबाबत पक्ष श्रेष्ठींशी चर्चा झाली आहे, असे नगरसेविका  जागृती   बढे यांनी सांगितले.