उमविचे नामकरण अध्यादेशाची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:42 PM2018-05-03T22:42:29+5:302018-05-03T22:42:29+5:30

11 ऑगस्ट रोजी नामकरण सोहळा?

Nomination nomination ordinance | उमविचे नामकरण अध्यादेशाची शिफारस

उमविचे नामकरण अध्यादेशाची शिफारस

Next
ठळक मुद्दे उमवित तयारी सुरु खान्देशवासियांमध्ये आनंद
गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतचा अध्यादेश काढण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आली. दरम्यान, हा नामकरण सोहळा 11 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. या सोहळ्यास कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित राहतील. विधीमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमविस बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याबाबतची घोषणा 22 मार्च रोजी केली होती. या घोषणेनंतर गेल्या दहा दिवसांपूर्वीच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात लेखी पत्र देवून नामकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी विनंती केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत नामकरणासाठीचा अध्यादेश काढण्याची शिफारस करण्यात आली. आता विधानसभेत यास मंजुरी घेतली जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात 24 रोजी बहिणाबाई चौधरी यांची जयंती आहे, हे औचित्य साधून उमविचा नामकरण सोहळा 11 ऑगस्ट रोजी करण्याचे बैठकीत ठरले असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातही नामकरण सोहळ्याची तयारी सुरु झाली असल्याची म ाहिती ूसूत्रांनी दिली.

Web Title: Nomination nomination ordinance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव