शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुणालाही खूश करण्यासाठी बैठक नाही - रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:20 IST

कॉँग्रेस ५० वर्षे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार नाही

जळगाव : आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. सर्व पक्ष विरूद्ध भाजपा अशी परिस्थिती देशात आणि राज्यात आहे. २०१९ ची निवडणूक जिंकाल तर कॉँग्रेस येती ५० वर्षे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करणार नाही. आजची बैठक ही संघटनेचा आढावा घेण्यासाठी आहे, कुणाला खूश करण्यासाठी नाही असा चिमटा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी येथे आयोजित बैठकीत घेतला.जळगाव लोकसभा मतदार संघातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, न.पा., मनपा सदस्य, तालुका अध्यक्षांची बैठक शहरातील ब्राह्मण संघाच्या सभागृहात आयोजिण्यात आली होती. बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे,प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, खासदार ए.टी. पाटील, माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, महापौर सिमा भोळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांकडे ‘नाना’ नाहीए.टी. नाना यांचा उल्लेख करून दानवे म्हणाले, ए.टी. पाटील यांंना उच्चांकी मतदान झाले. प्रत्येक मतदार संघात असे ‘नाना’ नाहीत. त्यांचा विजय पक्षाची काही मदत व अन्य काही युक्त्यांनी झाला असे दानवे म्हणताच सभागृहात एकच हंशा पिकला.भ्रमात राहू नकानवीन मतदार वाढविणे यावर भर द्या आपल्याबरोबर असलेले जुने टिकवून नवीन मतदार वाढवा. विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी १० जण स्पर्धेत आहेत. आमच्याकडे नरेंद्र मोदी आहेत. मात्र भ्रमात राहू नका. मी येथे कुणाला खूश करण्यासाठी आलो नाही, असा चिमटा घेऊन आगामी काळात निवडणूक जिंकायची असेल तर यंत्रणा उभी करा. २०१९ ची निवडणूक जिंकाल तर येती ५० वर्र्षे कॉँग्रेस निवडणूक लढविण्याची हिंमत करणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.खडसे - महाजन शेजारी शेजारीबैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना शेजारी-शेजारी बसविण्यात आले होते. दोघेही दानेवेंनी केलेल्या कोटीवर हसत होते. मात्र ते एकमेकांशी फारसे बोलले नाही. प्रास्ताविक आमदार सुरेश भोळे यांनी तर राजकीय विश्लेषण मांडणी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केली.कार्यकर्त्यांना काढले बाहेरबैठकीस कुणाकुणाची उपस्थिती अपेक्षित आहे हे अगोदर सांगण्यात आले. ही बैठक सभा नाही, त्यामुळे अन्य अपेक्षित नसलेले सभागृहात असतील तर त्यांनी बाहेर जावे अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या. पत्रकारही बैठकीत अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले.पालकमंत्री भेटलेच नाहीपालकमंत्री चंद्रकांत पाटील पाचोऱ्यात आले असताना ते आम्हाला न भेटता किंवा न सांगता विरोधक आर. ओ. पाटील यांच्याकडे गेले. पक्ष आमच्याकडून अपेक्षा ठेवतो तशी अपेक्षा आमचीही असल्याचे पाचोरा तालुका प्रमुखांनी गाºहाणे तालुक्याची माहिती देतांना मांडले.लोकसभेबरोबर विधानसभेचीही तयारी करालोकसभा निवडणुकीची तयारी करत असताना पुढील सप्टेंबरमध्ये होणाºया निवडणुकीचीही तयारी करा, असे संघटनमंत्री विजय पुराणिक यावेळी म्हणाले. २०१४ ची निवडणूक आपण सोशल मिडियाच्या बळावर जिंकली. ती कला आता इतरांनीही साध्य केली आहे. आता लोकसभा, विधानसभा मतदार संघात एक खास टीम तयार करा. साशेल मिडियाचा प्रभावी वापर करा असेही पुराणिक म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाJalgaonजळगाव