शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा नको, अंमलबजावणी व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 23:52 IST

पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे विश्लेषणबहिणाबाईंचे स्मारक खान्देशात आनंद

सचिन देवजळगाव : पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी  असोदा येथील बहिणाबाई चौधरी यांच्या जुन्या घराची खरेदी करुन, त्यांच्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या घरामुळे बहिणाबाईच्या आठवणी कायम स्वरुपी जिवंत राहणार असून,स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केली असली तरी, त्याची अंमलबजावणीदेखील लवकर करण्याची मागणी जोर धरु लागलीअहे. इतकेच नव्हे तर सध्या बहिणाबाईंच्या घरात राहत असलेल्या सरोदे कुटुंबियांनीदेखील स्मारकासाठी घर देण्यासाठी राजी झाले असून, लवकरात लवकर शासनाने घर खरेदी करण्याची मागणी केली आहे.आपल्या कवितांमधुन जीवनाचे तत्वज्ञान शिकविणाºया व खान्देशचे नाव जगाच्या कानाकोपºयात नेणाºया कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिल्यानंतर पुन्हा एकदा बहिणाबाईच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. विद्यापीठाला त्यांचे नाव मिळाल्यानंतर सर्वत्र फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यानंतर पुन्हा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी असोदा येथील बहिणाबाईच्या जन्मघर खरेदी करुन, त्या घराला स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर, पुन्हा एकदा खान्देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने आता हे घर लवकर खरेदी करुन, स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी खान्देशवासियांतर्फे करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर  बहिणाबाई चौधरी यांचे  घर खरेदी केलेल्या गावातील नागरिक सिताराम राजाराम सरोदे यांनीदेखील  बहिणाबाईच्या स्मारकासाठी घर विक्री करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यांनी१९६२ मध्ये कवयित्री  बहिणाबाई यांच्या नातलगांपासूनअवघ्या ६ हजार रुपयांत घर खरेदी केले होते.  काळानुरुप रस्त्यांची उंची वाढल्याने,  घरदेखील रस्त्याच्या समान आले आहे. मात्र, दीडशे वर्षानंतरही घराची स्थिती जैसे थे मजबूत आहे. संपूर्ण घर सागवानी लाकडाने सागवानाने उभारले असून,  घराचे बांधकाम दुमजली आहे. खाली तीन खोल्या आणि वरच्या मजल्यावर दोन खोल्या आहेत. घरातील सºयांच्या लाकडी भीमवर आकर्षक कलाकृती साकारली आहे. घराच्या भीतींदेखील मजबूत आहेत. विशेष म्हणजे घरात पावसाळ््यात कुठेही  एक थेंबदेखील पाझरत नसल्याचे या घरात राहणाºया सरोदे कुटुंबियांनी सांगितले.  बहिणाबाईचा या घरात   १८८० मध्ये जन्म झाला असून, या आधीहीं या घराची उभारणी  करण्यात आली आहे.जाता जाता पर्यटन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे सर्वत्र स्वागत होत असून, आता स्थानिक नेत्यांनी याचा पाठपुरावा करुन, अंमलबजावणी करण्याची मागणी जिल्हावासियांतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव