शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधार कार्ड नाही, भिकाऱ्यांना लस कशी देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:51 IST

शहरातील रात्र निवारा केंद्रात ५९ भिकाऱ्यांची नोंद

जळगाव : शासनातर्फे आधार क्रमांकाच्या आधारे नोंदणी करून, कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सध्या बहुतांश नागरिकांकडे आधार कार्ड असले तरी रस्त्यांवर राहणाऱ्या बेघर नागरिकांकडे, भिकाऱ्यांकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र म्हणून ठोस पुरावा नाही. त्यामुळे या भिकाऱ्यांना कोरोनापासून बचावासाठी कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी कशा पद्धतीने करणार? आणि लस कशी देणार? हे आव्हान आहे.कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू झाला आहे. या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील नागरिकांना आणि अन्य व्याधी असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर करण्यात येत आहे. याद्वारे नागरिकांची आरोग्यविषयक माहिती भरून, लसीकरणाची तारीख, वेळ व ठिकाण सांगण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया लसीकरणासाठी असताना, ज्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नाही, त्यांची जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने नोंदणी करणार? आणि त्यांना कधी लस मिळणार? याबाबत शासनातर्फे कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. शहरातील मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, शहरात एका खाजगी संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत महिला व पुरुषांसह ५९ बेघर आढळून आले आहेत. यातील एकाही व्यक्तीकडे आधार कार्डसह इतर कुठलेही ओळखपत्र नसल्याचे मनपाच्या शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील यांनी सांगितले.

शहरातील भिकारी५९बेघर निवाऱ्यात राहणाऱ्यांची संख्या

५९महिला - ३७पुरुष - २२मनपा प्रशासनाने आधार कार्ड काढले तर होणार लसीकरण- केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी सक्तीची केली आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे. मात्र, मनपा प्रशासनाने ठरविले, तर या निवारा केंद्रातील नागरिकांचे आधार कार्ड काढून लसीकरण करता येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी सांगितले.- मनपा प्रशासनाने एकाचवेळी सर्व नागरिकांचे आधार कार्ड काढून, त्या नंबरद्वारे कोरोना लसीकरणाची ऑनलाइन नोंदणी करता येईल.- नोंदणी केल्यानंतर शासनाच्या निकषामध्ये पात्र ठरत असलेल्या येथील सर्व नागरिकांचे एकाच दिवशी लसीकरण केले जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.बेघर नागरिकांची स्टेशन परिसरात सर्वाधिक संख्या- मनपाच्या रात्र निवारा केंद्रातर्फे गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शहरात सर्वाधिक बेघर नागरिकांची संख्या जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली आहे.- तसेच नवीन बस स्टॅण्ड, जिल्हा रुग्णालय, टॉवर चौक, गोलाणी मार्केट परिसर व शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये बेघर नागरिकांचे वास्तव्य आढळून आले. हे बेघर नागरिक दिवसा शहरातील विविध भागांत फिरून उदरनिर्वाह करतात व रात्री पुन्हा याच ठिकाणी मुक्काम करीत असल्याचे सांगण्यात आले.- तसेच या सर्वेक्षणात जळगाव शहरात स्वत:चे घर, नातलग असतानाही काही नागरिक घर सोडून कधी बस स्टॅण्डवर तर कधी रेल्वे स्टेशनवर राहत असल्याचे आढळून आले. यातील काही नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठविण्यात आले असल्याचे रात्र निवारा केंद्र प्रशासनातर्फे सांगण्यात आले.केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे शहरात संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात शहरातील विविध भागातील बेघरांचा शोध घेऊन, त्यांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना घराप्रमाणे चहा, नाष्टा, जेवण व इतर सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असून, सध्या या ठिकाणी ५९ बेघर आहेत.- दिलीप चोपडा, प्रकल्प प्रमुख, केशव स्मृती प्रतिष्ठान

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डJalgaonजळगाव