शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

जि.प.शाळेत शिक्षण घेतलेला नीलेश झाला सी.ए.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 15:58 IST

जि.प.शाळेत शिक्षण घेतलेला नीलेश लढे हा सी.ए. परीक्षा पास झाला आहे.

मतीन शेख 

मुक्ताईनगर :  घरात आठरावे विश्व दारिद्र्य, महाविद्यालयात फी भरण्यासाठी पैसे नाही. शिक्षण घेण्यास स्वता कमवा आणि शिका याशिवाय पर्याय नव्हता.अशा परिस्थितीत कोथळी येथील नीलेश लढे याने शिक्षण घेत सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली आहे.विशेष म्हणजे या युवकाने सातवीपर्यंतचे शिक्षण कोथळी जि.प. शाळेतून घेतले. जि.प. शाळेतून शिक्षण घेणाऱ्या नीनिलेशच्या यशाने त्याच्या कुटुंबासह गुरुजन भारावले.कोथळी येथील जगन्नाथ पुंडलीक लढे मूळचे तळवेल, ता.भुसावळचे. घरची परिस्थिती हलाखीची. शिक्षणाची सोय नव्हती म्हणून ते तळवेल येथून मामाच्या घरी कोथळी आले. शिक्षण घेतानाच मामांचे छत्र हरविल्याने ते पोरके झाले. दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून त्यांनी संसार सुरू केला. आजही ते कोथळीच्या बेघर वस्तीत राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मुलगा नीलेश जगन्नाथ लढे याला शिक्षण देण्यास हतबल होते.सातवीपर्यंत कोथळी जि.प. शाळेत शिक्षण घेणारा नीलेश जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज सी.ए. झाला आहे. माध्यमिक शिक्षण मुक्ताईनगरच्या जे.ई.स्कूलमध्ये घेतले तर महाविद्यालयिन शिक्षण जळगावच्या मू.जे.महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात शैक्षणिक फी भरण्यासही नीलेशकडे पैसे नव्हते. पहिल्या सत्रात सहा हजार रुपये उधारीने घेऊन भरले. नंतर दिवसा महाविद्यालयात शिक्षण आणि त्यानंतर बाहेर सी.ए.कडे काम करून मिळणाऱ्या जेमतेम मोबदल्यावर त्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि एकदा आलेले अपयश पचवत त्याने ४७८ गुण मिळवून सी.ए.ची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे.आपल्या यशाचे श्रेय तो उच्च माध्यमिक चे शिक्षक संजय देशमुख, के.एम.चौधरी यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शन ला देतो. जे.ई.स्कूलच्या इतिहासात तो दुसरा सी.ए.होणारा विद्यार्थी आहे.आजच्या विलासी सुविधा असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेत जि.प.शाळेचा विद्यार्थीही सी.ए. होऊ शकतो हे नीलेशने करून दाखविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणMuktainagarमुक्ताईनगर