दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 06:07 PM2020-11-17T18:07:05+5:302020-11-17T18:07:12+5:30

भुसावळ  : तालुक्यातील कुऱ्हे  ( पानाचे ) येथील कृष्णदीप दीपक पाटील ( १३ ) हा पाचोरा तालुक्यातील  वाणेगाव येथे ...

A niece who went to her uncle's village for Diwali drowned | दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू

दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेलेल्या भाच्याचा बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देभाऊबीजेच्या दिवशीची घटना, गावात हळहळ

भुसावळ  : तालुक्यातील कुऱ्हे  ( पानाचे ) येथील कृष्णदीप दीपक पाटील ( १३ ) हा पाचोरा तालुक्यातील  वाणेगाव येथे दिवाळीसाठी मामाच्या घरी गेला असता ऐन भाऊबीजच्या दिवशी १६ रोजी त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे कुऱ्हे  ( पानाचे ) व वानेगावसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 
कृष्णदीप हा दीपक लहानु पाटील या सैनिकाचा मुलगा होता . 
भाऊबीज साठी आईसोबत सोबत तो १६ रोजी  पाचोरा तालुक्यातील वाणेगाव   येथे गेला होता.  मित्रांसोबत जातो असे सांगून तो शेतात गेला होता.  मित्रांसोबत शेतात गेल्यानंतर तेथील शेततळ्यात  पडल्याने बुडून  त्याचा मृत्यू झाला. 
धावपळ व्यर्थ 
हा प्रकार लक्षात आल्याव मुलांनी धावपळ करत आरडाओरड केली. यानंतर त्याला लागलीच   उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला असल्याच डॅाक्टरांनी जाहीर केले.  दीपक पाटील हे जम्मू काश्मीर येथे सैन्यात कार्यरत आहे. त्यांची सुट्टी दोन दिवसानंतर संपणार होती. त्यामुळे ते १७  रोजी जम्मू-काश्मीर येथे जाणार होते .
कृष्णदीप हा भुसावळ येथील गोदावरी स्कूल मध्ये इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. वडील सैन्यात आहे . तर आजोबा लहानु पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहे.
 

Web Title: A niece who went to her uncle's village for Diwali drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.