शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नवजात शिशुच्या आधारकार्डचा जानेवारीचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:47 IST

आता मुहूर्त कधी ? : प्रशिक्षणाचे काम रेंगाळले

जळगाव : नवजात शिशुचंही आधारकार्ड काढण्याचा केंंद्र शासनाचा १ जानेवारीचा मुहूर्त हुकला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचे अद्याप प्रशिक्षणच न झाल्याने आरोग्य विभागाचा हा उपक्रम रेंगाळला आहे. आता हा मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल केला जात आहे.सध्या सर्वच ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अगदी पाच वर्षाच्या बालकापासून ते अगदी वृध्दांपर्यंत साऱ्यांनाच आधारकार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानंतर आता केंंद्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत नवजात शिशुंचेही आधारकार्ड काढण्याचा निर्णय घेतला होता. १ जानेवारीपासून हा निर्णय अंमलात येणार होता. मात्र त्याबाबत कोणतीच ठोस पावले उचलली न गेल्याने व नियोजनाअभावी हा प्रकल्प रेंगाळला आहे.प्रत्येक आरोग्य संस्थेत अशाप्रकारची व्यवस्था करण्यात येणार होती. यासाठी एक परिचारिका व एक लिपिकवर्गीय कर्मचारी अशा दोघांची नियुक्ती करण्यात येणार होती.प्रत्येक एका आधारकार्ड नोंदणीला २७ रुपये मानधन देण्यात येणार होते. प्रोत्साहनपर भत्ता या स्वरुपात हे मानधन देण्यात येणार होते. मात्र, या कर्मचाºयांचे प्रशिक्षणच अद्याप पूर्ण झालेले नाही. आरोग्य विभाग व भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्यामार्फत हे प्रशिक्षण घेण्यात येणार होते.नवजात शिशुंना आधारकार्ड देण्याबाबचे पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहे. मात्र यासाठी आरोग्य विभागातील कर्मचाºयांना प्रशिक्षण देणारे अधिकारी त्यांच्या कामातील व्यस्ततेमुळे उपलब्ध होऊ न शकल्यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. मात्र पुढील आठवडाभरात हे प्रशिक्षण सुरु होईल अणि ते संपल्यानंतर लगेचच नवजात शिशुंसाठी आधारकार्डचा उपक्रम हाती घेतला जाईल.-दिलीप पोटोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जळगावआधारकार्ड निळ्या रंगाचे असणार...हे आधारकार्ड रंगाने निळे असेल व त्यासाठी कोणत्याही बायोमेट्रीक तपशिलाची गरज राहणार नाही. या नवजात शिशुचे आधारकार्ड हे त्याच्या पालकांच्या आधारशी जोडले जाणार आहे. या शिशूचे बायोमेट्रीक हे तो पाच वर्षाचा झाल्यानंतर बदलण्यात येणार आहे. यासाठी पालकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचे आधारकार्ड असणे अनिवार्य असणार आहे.आधारकार्ड काढताना नवजात शिशुचा जन्मदाखला बंधनकारक असून आधारकार्ड काढताना मोबाईल अनिवार्य आहे. आधारकार्ड नोंदणी झाल्यानंतर एक मेसेज नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल त्यानंतर ६० दिवसात हे आधारकार्ड संबंधित पालकांना मिळेल.या बालकाचे आधारकार्ड पाचव्या वर्षापासून १५व्या वर्षांपर्यंत अपडेट मोफत केले जाणार आहे. एखाद्या मुलाचा नामकरण विधी झाला नसेल तर हे आधारकार्ड त्याच्या मातेच्या नावे वितरित केले जाणार आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJalgaonजळगाव