जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदविला गेला़ एका दिवसात ११८५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे़ गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा १ हजारांपेक्षा अधिक रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत़ सोमवारी ७ मृतांची नोंद असून ५१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत़सोमवारी ४६४० अहवाल समोर आले त्यापैकी ३४५५ अहवाल निगेटीव्ह आले आहेत़ दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी १०६३ बाधित एका दिवसात समोर आले होते़ मात्र, ही एका दिवसातील सं ख्या नसून त्यात काही रात्री आलेल्या अहवालांचा समावेश असतो़ त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले होते़ दरम्यान, तीन दिवसांनी पुन्हा नवा उच्चांक समोर आला आहे़ असे असतानाही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२़५ टक्क्यांवर पोहचल्याने दिलासा मिळाला आहे़
नवा उच्चांक : जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात कोरोनाचे तब्बल ११८५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 21:45 IST