शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

केळीच्या नवीन लागवडीला आता सीएमव्ही रोगाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:06 IST

जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.

ठळक मुद्दे रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिकावादळी पावसात ९०० हेक्टरमधील बागांचे नुकसान

किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : जून महिन्यात तीन वेळा झालेल्या वादळी पावसात ९०० हेक्टरमधील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर आता नवीन लागवड केलेल्या केळीवर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) चे संकट बांधावर घोंघावत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे.रावेर तालुका केळीचे माहेर म्हणून ओळखला जातो. असे असले तरी या माहेरातच एकीकडे मायबाप सरकारकडून व व्यापारी वर्गाकडून केळी उत्पादकांना मेटाकुटीस आणले जात आहे, तर दुसरीकडे लहरी निसर्गाच्या आकांडतांडवाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराधार ठरली असताना जून महिन्यातील सुरुवातीच्या पंधरवड्यात वादळी पावसाने तडाखा दिल्याने तालुक्यातील सुमारे ३५ गावांमधील ९०० हेक्टरमधील उभ्या कापणीवरील केळीबागा भुईसपाट झाल्या. यात सुमारे ७५ कोटी रुपयांची अपरिचित हानी झाली आहे. विमा कंपनीने वाºयावर सोडले असताना ९५ कोटी अर्थात १ अब्ज रूपयांचा हा तोंडी आलेला मोठा घास निसर्गाने हिरावून घेतला. हे संकट कमी की काय मृगबहार लागवडीखालील केळीबागांवर कुक्कूंभर मोझॅक व्हायरस केळीबागांच्या बांधावर घोंघावू लागला आहे. तालुक्यातील विवरे बुद्रूक येथील एका केळीबागेत सात खोडांवर या रोगाचा प्रादुर्भाव यंदा प्रथमच आढळून आला आहे.रावेर व यावल तालुक्यात अजून वाढता प्रादुर्भाव नसला तरी, केळी बागांमधील व बांधावरील वाढते तण व वेलवर्गीय पिकांमुळे रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव वाढून कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत आहे. तणविरहीत बागा ठेवून व दर आठवड्याला न चुकता कीटकनाशकांची फवारणी करून त्यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.जून महिन्याच्या आरंभीच पाऊस सुरू झाल्याने तणवाढ लवकर झाली. किंबहुना ढगाळ वातावरणात केणा, चिल्याची भाजी, दुधी या तणांसह बांधावरील जंगली तणाचे वेल तथा बांधालगत मका, चवळी, कपाशी, मिरची, वांगी आदी असल्यास त्यावर दर आठवड्याला इमिडा ८ मि.ली., अ‍ॅसिफेट १५ ग्रॅम, निंबोळी अर्क ५० मि.ली. असे मिश्रण १५ लीटर पाण्यात घेऊन दर आठवड्याला न चुकता फवारणी केल्यास कुक्कूंभर मोझॅक व्हायरसचा बंदोबस्त वेळीच करता येवू शकतो-डॉ.के.बी.पाटील, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ, जळगाव

टॅग्स :fruitsफळेRaverरावेर