शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

कभी रुकना नही, चलतेही रहना - हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 21:05 IST

नवोदितांना मार्गदर्शन

ठळक मुद्देखेळ आणि शिक्षण सोबत चालले पाहीजे तरच भवितव्य उज्ज्वलप्रत्येकच विजय माझ्यासाठी महत्वाचा

ललित झांबरे/ आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. २५ - खेळात करियर सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. डॉ.बेंडाळे महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त त्या जळगावात आल्या असताना त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, खेळ आणि शिक्षण सोबत चालले पाहीजे तरच भवितव्य उज्ज्वल असते आणि कितीही अडचणी आल्या तरी खेळाडूला थांबून चालत नाही. कभी रुकना नही, चलतेही रहना, असा मंत्र त्यांनी दिला.२००६ मध्ये आपण निवृत्ती पत्करल्यानंतर गेल्या १०-१२ वर्षात भारताच्या महिला हॉकीने बरीच प्रगती केली आहे. या काळात आपण क्रमवारीत १३ वरून १० व्या स्थानापर्यंत प्रगती केली.अधिकाधिक स्पर्र्धात आपले संघ हल्ली खेळत असतात आणि हॉकीच्या प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने तंत्र आणि कौशल्यातसुद्धा सुधारणा झाली आहे.आता टेलिव्हीजन आणि इंटरनेटमुळे प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ बारकाईने अभ्यासता येतो आणि त्यानुसार डावपेच आखून तयारी करता येते. या शिवाय पुरुष व महिला हॉकीच्या एकीकरणातून हॉकी इंडियाच्या निर्मितीने भारतात महिला हॉकीला चांगले दिवस आले असल्याचे त्या म्हणाल्या.भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे (२००२ ते २००४) आपण भागीदार असल्याचा अभिमान असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, २००२ चे राष्टÑकुल सामने, २००३ चे आफ्रो-अशियाई सामने आणि २००४चा अशिया कप या सुवर्णविजेत्या संघात आपण गोलरक्षक होतो मात्र या पैकीकोणता एक विजय नाही तर प्रत्येकच विजय माझ्यासाठी महत्वाचा होता. भारतासाठी त्या-त्या दिवशी आपण सर्वाेत्तम योगदान देऊ शकलो याचा आनंद व अभिमान अजूनही आहे. एक स्पर्धा संपली की दुसरी आणि नवीन आव्हान असा विचार करून आपण खेळत आल्याचे त्या म्हणाल्या.संघाचा मुख्य प्रशिक्षक भारतीयच असावा आणि सहप्रशिक्षक परदेशी असावेत असे मत हेलनने ठासून मांडले. भारतीय प्रशिक्षक असला तर त्याला खेळाडूंच्या सामाजिक, आर्थिकस्तराची जाणिव असते आणि खेळाडूंच्या राहणीमान व आहाराची सुद्धा कल्पना असते. ही माहिती खेळाडूंच्या प्रशिक्षणात फार महत्त्वाची ठरते. कौशल्य विकासाबाबत परदेशी प्रशिक्षकांची चांगली मदत होऊ शकते. अलिकडे खेळाडूंची जवळून माहिती मिळत असल्याने ‘मॅन टू मॅन’ डावपेच आखून तयारी करून घेता येते असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :JalgaonजळगावSportsक्रीडा