शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

निपाण्यात गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 20:56 IST

गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी झाली.

ठळक मुद्देतक्रारदार पुढे आला नाहीसंबंधितास समज देऊन सोडले

निपाणे, ता.एरंडोल, जि.जळगाव : येथे गावठी दारू अड्ड्यावर ‘तळीरामां’मध्ये हाणामारी झाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेऊन नंतर समज देऊन सोडून देण्यात आले. ४ रोजी सायंकाळी हा प्रकार घडला.लॉकडाऊन काळात मद्याची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जिल्ह्यात पोलीस विभाग गावठी दारूचे उद्ध्वस्त करीत आहे. असे असतानाही निपाणे येथे गावठी दारूची खुलेआम विक्री होत आहे. ४ रोजी गावठी दारू अड्ड्यावर तळीरामांमध्ये हाणामारी झाली. याची खबर पोलिसांना लागली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कोणीही तक्रार दिली नाही.हाणामारी करणाऱ्याला ५ रोजी सकाळी पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले. पोलिसांनी संबंधितास समज देऊन सोडून दिले.दरम्यान, जवखेडेसीम येथे मद्य विक्री बंद आहे. त्यामुळे तेथील तळीराम दारू पिण्यासाठी निपाणे येथे दररोज ये-जा करतात. एवढी गर्दी असते की जशी काय यात्राच भरलेली दिसते. त्याच बाजुला मांस विक्रेत्याचे दुकान आहे. परिणामी भरपूर गर्दी राहते. अशा परिस्थितीत दारू बंद करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीErandolएरंडोल