शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
2
Russian Woman : गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचे गुढ उकलले; एका व्यावसायिकाच्या होती प्रेमात, मुलांचे वडील सापडले
3
नर्स निमिषा प्रियाचा जीव वाचवला जाऊ शकतो! जिथे सरकारनेही आशा सोडली, तिथे 'या' व्यक्तीने सांगितला मार्ग
4
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
5
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
6
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
7
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
8
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
9
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
10
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
11
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
12
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
13
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
14
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
15
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
16
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
17
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
18
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
19
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
20
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा

वाघूर धरणसाठा नव्वदीजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 00:08 IST

सात दिवसात सहा टक्क्यांनी वाढ

जळगाव : जिल्ह्यातील धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जिल्ह्यातील हतनूर, गिरणा व वाघूर या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १७.५६ टीएमसी  उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. वाघूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या सात दिवसात वाघूर धरणाच्या साठ्यात ६.०७ टक्कांनी वाढ झाली आहे. तर अंभोरा, मंगरुळ, सुकी, अग्नावती, तोंडापूर व हिवरा हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.जळगावात पाऊस गायब असताना ‘वाघूर’मध्ये वाढगेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच दडी मारली आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढत आहे. सोबतच उकाडाही कायम असल्याने सर्वांना नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. जळगावात पाऊस गायब असला तरी जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. वाघूर नदीचा उगम असलेल्या अजिंठा लेणी परिसरातील डोंगररांगामध्ये दररोज मुसळधार पाऊस होत असल्याने वाघूर नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे नदीला सलग पूर सुरू असून जळगावनजीकच्या वाघूर धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळेच गेल्या सात दिवसांमध्ये ध्नरणाच्या साठ्यात ६.०७ टक्क्यांनी वाढ होऊन धरण साठा ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे जळगाव व जामनेर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.जिल्ह्यात हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून अभोरा, मंगरुळ, सुकी, मोर, अग्नावती, हिवरा, बहुळा, तोंडापूर, अंजनी, गूळ, भोकरबारी, बोरी, मन्याड हे १३ मध्यम प्रकल्प आहे. तर ९६ लघु प्रकल्प आहे. या सर्व प्रकल्पांचा एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा १४२७.५१ दलघमी म्हणजेच ५२.९९  टीएमसी आहे.तीनही धरणांच्या साठ्यात वाढसलग पाऊस सुरू असल्याने वाघूर, गिरणा, हतनूर  धरणाच्या साठ्यात वाढ होत आहे. यात वाघूर धरण साठ्यात तर २५ दिवसात १६.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  ६ जुलै वाघूर धरणात ७२.३४ टक्के साठा होता. तो १६ जुलै रोजी ७८.१८ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ८२.७५ टक्के झाला. यात वाढ सुरूच राहून तो आता ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. अशाच प्रकारे गिरणा धरणात ६ जुलै रोजी ३७.८३ टक्के असलेला साठा १६ जुलैपर्यंत ३८.२६ टक्क्यांवर पोहचला. त्यानंतर २६ जुलै रोजी हा साठा ४२.४९ टक्क्यांवर पोहचला व आता हा साठा ४५.६३ टक्के झाला आहे. हतनूर धरणाचीही पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे दरवाजे दररोज उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात सध्या १४.७५ टक्के साठा आहे.  जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा १०२७.१०  दलघमी म्हणजेच ३६.२६  टीएमसी इतका असून या प्रकल्पांमध्ये ४९७.२४  दलघमी म्हणजेच १७.५६  टीएमसी उपयुक्त साठा आहे. यामध्ये हतनूर धरणात १.३३ टीएमसी, गिरणा ८.४४ टीएमसी तर वाघूर धरणात ७.७९ टीएमसी  उपयुक्त साठा आहे.  तसेच जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचा प्रकल्पीय उपयुक्त साठा २०३.९१ दलघमी म्हणजेच ७.२०  टीएमसी  आहे. तर जिल्ह्यातील ९६ लघु प्रकल्पात  ४६.२९  दलघमी म्हणजेच ६.९३  टीएमसी  उपयुक्तसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव