शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान सभेमुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ‘नवनिर्माण’

By विलास बारी | Updated: September 7, 2023 19:41 IST

चोपडा, अमळनेर व जळगाव शहरसाठी चाचपणी : पक्षसंघटना सोबत असल्याचा मिळाला संदेश

जळगाव : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे नेते व खासदार शरद पवार यांची जळगाव जिल्ह्यात पहिली स्वाभिमान सभा झाली. या सभेमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला असताना चोपडा, अमळनेर व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी चाचपणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अमळनेर येथील आमदार अनिल पाटील हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. मात्र, पक्ष संघटना ही मोठ्या प्रमाणात खासदार शरद पवार यांच्या बाजूने राहिली. पक्ष संघटना आणि आगामी लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अमळनेर, चोपडा व जळगाव शहरात चाचपणीराष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चाचपणी सुरू केली आहे. जळगाव ग्रामीण, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, अमळनेर, चाेपडा, जामनेर या भागात पक्षाचे संघटन चांगले आहे. गेल्या वेळी जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने लढविली होती. फारशी तयारी नसताना उमेदवार अभिषेक पाटील यांनी चांगली लढत दिली होती. जळगाव शहरसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या महापाैर जयश्री महाजन यादेखील इच्छुक आहेत. मात्र, ही जागा ठाकरे गटाला जाते की राष्ट्रवादीला याबाबत अजून अनिश्चितता आहे. त्यातच खासदार शरद पवार यांची महापौर जयश्री महाजन यांच्या घरी सदिच्छा भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि खडसेंना बळ

या सभेच्या निमित्ताने शरद पवार यांनी जळगाव ग्रामीणसाठी इच्छुक उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना बळ दिले आहे. देवकर यांनी सभेचे नियोजन व्यवस्थित केले. राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसे हे आक्रमक नेते असल्याने पक्षाने त्यांच्यासह त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी दिल्याचे या दौऱ्यांच्या निमित्ताने दिसून येत आहे.

विधानसभेसोबत लोकसभेवर डोळाप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात खडसे यांच्या नेतृत्वात भाजपने खासदारकीच्या जागा विजयी केल्याचा संदर्भ देत आता राष्ट्रवादीच्या दोन्ही जागांची जबाबदारी खडसेंकडे सोपविण्याचे संकेत दिले आहे.

राष्ट्रवादी दिसली एकसंघ

या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी पहिल्यांदा एकसंघ दिसली. सभास्थळी तालुक्यानुसार बैठक व्यवस्था तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्याने व नेत्यांनी यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. जळगाव ग्रामीण व चोपडा या भागातून सर्वाधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती सभेला होती.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव