जळगाव : मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ गुरूवारी सकाळी विविध प्रभागांमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर पदाच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या विश्वास व्यक्त करीत यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.विधानसभेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक दिलीप वळसे पाटील यांचा दौरा अचानक रद्द झाल्याने जिल्हा पदाधिकाºयांच्या उपस्थितीतच शहरातील विविध प्रभागात गुरूवारी सकाळी प्रचारचा शुभारंभ झाला. यानंतर जिल्हा पक्ष कार्यालयात सर्व उमेदवारांच्या महत्वपूर्ण बैठकीत मार्गदर्शन करतांना देवकर बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी मनपात राष्ट्रवादीची भूमिका निश्चितच किंगमेकरची राहणार असल्याचे सांगत प्रचार यंत्रणेच्या टिप्स दिल्यात. याचबरोबर माजी आमदार दिलीप वाघ , अरूण पाटील , दिलीप सोनवणे ,जिल्हा बॅक संचालक अॅड. रविंद्र पाटील यांनी देखिल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:45 IST
जळगाव मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ गुरूवारी सकाळी विविध प्रभागांमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. महापौर पदाच्या सत्ता संघर्षात राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याच्या विश्वास व्यक्त करीत यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामास लागावे, असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटला
ठळक मुद्देगुलाबराव देवकर यांनी केले जोमाने कामास लागण्याचे आवाहनराष्ट्रवादी किंगमेकरच्या भूमिकेत राहणार असल्याचा विश्वासजिल्हा निरीक्षक दिलीप वळसे-पाटील यांची गैरहजेरी