शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हाच सक्षम पर्याय - अनिल भाईदास पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 15:33 IST

संस्थात्मक अनुभवाच्या बळावर उमेदवारीची अपेक्षा

जळगाव : शरद पवार यांच्यासारख्या कर्तृत्ववान, द्रष्ट्या नेतृत्वाकडून जनसामान्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. भाजपा-शिवसेनेला राष्टÑवादी काँग्रेस पार्टी हा सक्षम पर्याय ठरू शकतो, असा विश्वास निर्माण करण्यात आम्हाला यश आले असल्याचा दावा जिल्हा बँकेचे संचालक व जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या अनिल भाईदास पाटील यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीची तयारी वेगात सुरू असून पक्षीय पातळीवर इच्छुक, सक्षम, प्रबळ अशा उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्टÑवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेल्या पाटील यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली आणि निवडणुकीविषयी मनमोकळी चर्चा केली.प्रश्न: राजकीय वारसा नसतानाही तुम्ही संस्थात्मक जीवनात मोठी कामगिरी केली. याठिकाणी काम करताना तुम्हाला काय अनुभव आला?पाटील : मला राजकीय पार्श्वभूमी नाही, हे अगदी खरे आहे. माझे वडील नोकरदार होते. माझा जन्म भडगावचा आहे. माझे शिक्षण चाळीसगाव, जळगाव येथे झाले. उच्चशिक्षणासाठी पुण्यात सिंबायसीसमध्ये गेलो. सध्या अमळनेरात वास्तव्य व व्यवसाय करीत आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्थेपासून माझ्या संस्थात्मक जीवनाला सुरुवात झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीचा १० वर्षे सभापती, जिल्हा परिषदेचा १० वर्षे सदस्य, जिल्हा बँकेचा १० वर्षे संचालक आहे. अमळनेर पालिकेत पत्नी जयश्री या नगराध्यक्ष होत्या. यंदाही आमची आघाडी विजयी झाली. पण पुढचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.प्रश्न : लोकसभा निवडणूक लढविण्यामागील कारणमीमांसा काय?पाटील : माझा संस्थात्मक अनुभव पाहता प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र निश्चित असते. विविध कार्यकारी संस्था, जिल्हा बँक, जिल्हा परिषद गट, पालिका क्षेत्र असा अनुभव घेतल्यानंतर लक्षात आले की, सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश असलेल्या लोकसभा मतदारसंघ हा व्यापक आणि लोकाभिमुख कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या कार्यकर्त्याला आव्हानात्मक असा आहे. केंद्र सरकारच्या विविध खात्यांचा मोठा निधी अभ्यासपूर्वक मतदारसंघात आणता येईल, असा मला विश्वास आहे.प्रश्न : तुम्ही राष्टÑवादी काँग्रेस पक्षात नवखे आहात, तुम्हाला स्विकारले जाईल, असे वाटते.पाटील : शरद पवार यांचा परिसस्पर्श झालेल्या या पक्षात खुलेपणा, दिलदारपणा असल्याचे अल्पावधीत जाणवले. तळागाळातील माणसांचा तसेच शेतकºयांचा विचार करणारा हा पक्ष आहे. समुद्रातील थेंब बनून त्यात मी सहभागी झालो आहे.प्रश्न : हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हटला जातो, मग राष्टÑवादी काँग्रेस कशी लढत देणार?पाटील : २००९ मध्ये आमचे ५ आमदार या मतदारसंघातून निवडून आले होते.काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचे चांगले समन्वय आणि संवाद आहे. पाच वर्षातील भाजपा सरकारच्या कामगिरीने जनता निराश झाली आहे, त्यांना बदल हवा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत.प्रश्न : भाजपा सोडण्याचे कारण काय ?पाटील: २००९ आणि २०१४ मध्ये अमळनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने मला उमेदवारी दिली. परंतु, स्थानिक पदाधिकाºयांचे असहकार्य, विरोधकांना केलेली मदत यामुळे पराभव झाला. भाजपामध्ये कार्यकर्त्यांचा फक्त वापर केला जातो, हा अनुभव आला. म्हणून पक्ष सोडला.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव