शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

जळगावात ‘राष्ट्रवादी’चे नियोजन अद्यापही कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:47 IST

जळगाव : मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसत आहे.उमेदवार दिलेल्या प्रत्येक प्रभागाला तीन निरीक्षक पदाधिकारी दिलेले असले तरीही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले दिसून येत नाही.सभांचे नियोजन सुरूचपक्षातर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचे ...

ठळक मुद्देप्रचार सभांचे नियोजन सुरूचकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा फियास्कोराष्ट्रवादीचे मोजकेच पदाधिकारी रस्त्यावर

जळगाव : मनपा निवडणुकीत यश मिळविण्यासाठी जिल्ह्याचे निरीक्षक तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आलेले नियोजन कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसत आहे.उमेदवार दिलेल्या प्रत्येक प्रभागाला तीन निरीक्षक पदाधिकारी दिलेले असले तरीही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले दिसून येत नाही.सभांचे नियोजन सुरूचपक्षातर्फे स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन सुरूच आहे. २५ ते ३० जुलै या कालावधीत या सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले असून आता त्याची मागणी प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या सभांची मागणी करण्यात आली आहे.मनपा निवडणुकीत दरवेळी होणारे मतांचे विभाजन टाळण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पार्टीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी वळसेपाटील यांच्या उपस्थितीतच बैठकांच्या फेऱ्या मागून फेºया झाल्या. मात्र तरीही प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी मात्र तब्बल १२ ठिकाणी आघाडीतील पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर आले. माघारीनंतरही तब्बल ८ ठिकाणी उमेदवार समोरासमोर आहेत. त्यामुळे आघाडीचा फियास्को झाला आहे.मोजकेच पदाधिकारी रस्त्यावरराष्टÑवादीने वळसेपाटील यांच्या उपस्थितीत निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी नियोजन केले. मात्र ते अद्यापही कागदावरच असल्याचे चित्र आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व काही जिल्हा पदाधिकारी वगळता जिल्ह्यातील कोणतेही पदाधिकारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेले दिसून येत नाहीत. त्यांच्याच उपस्थितीत उमेदवारांच्या प्रभागांमधून रॅली काढण्यात येत आहेत. पक्षाचा उमेदवार असलेल्या प्रत्येक प्रभागाला ३ निरीक्षक देण्याचा निर्णय झाला. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी मात्र सुरू झालेली दिसत नाही. प्रचार संपण्यास जेमतेम आठ दिवसांचा कालावधी उरला असताना जिल्ह्याचे निरीक्षक वळसे पाटील यांना अद्यापही जिल्ह्यात यायला वेळ मिळालेला नाही.

टॅग्स :JalgaonजळगावNCPराष्ट्रवादी काँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक