शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

भाजपचे दोन मते फुटल्याने पहूरला राष्ट्रवादीचा उपसरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:37 IST

भाजपच्या सत्तेला सुरुंग : श्यामराव साळवे यांनी मारली बाजी

पहूर, ता. जामनेर : पेठ ग्रामपंचायत मध्ये उपसरंपच पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे दोन मते फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी होऊन उपसरपंचपदी श्यामराव नामदेव सावळे यांनी विजय प्राप्त केला असून भाजपाचे बहुमत असतांनाही राष्ट्रवादीने भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. यामुळे तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र ते भाजपचे बंडखोर सदस्य कोण? हा स्थानिक भाजपासाठी चिंतनाचा विषय आहे.भाजपाने गेल्या वर्षी प्राप्त केला होता ऐतिहासिक विजयभाजपाने गेल्या वर्षी निसटता ऐतिहासिक विजय प्राप्त करून सत्ता स्थापन केली होती. यात भाजपाचे नऊ सदस्य तर राष्ट्रवादीचे आठ सदस्य असे संख्या बळ होते.भाजपाचे उपसरपंच रवींद्र मोरे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने एप्रिलमध्ये त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.या रिक्त पदासाठीसोमवारी पिठासीन अधिकारी सरंपच निता रामेश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली यासाठी भाजपाकडून महेराजबी शेख बिसमिल्ला यांनी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी कडून श्यामराव नामदेव सावळे यांचा अर्ज होता. त्यांना भाजपच्या दोन बंडखोर सदस्यांनी मतदान केल्याने श्यामराव सावळे यांना दहा मते मिळाली. यामुळे त्यांची उपसंरपच पदी निवड झाली. तर महेराजबी यांना फक्त सात मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला, गोपनीय पध्दतीने मतदान घेण्यात आले आहे.यामुळे काही काळ ग्रामपंचायत मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी भाजपाच्या सत्तेत वाटकरी झाल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आंनंद साजरा केलो. तर भाजपच्या गोटात धक्काच बसल्याचे दिसून आले आहे. निवडणूकीसाठी दोन्हींकडून पाच अर्ज दाखल झाले होते.माघारीच्या दरम्यान तीन अर्ज मागे घेण्यात आले होते. महेराजबी शेख बिसमिल्ला या सहा नंबर वाडार्तून ग्रामपंचायत निवडणुकीत अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत.माजी सरंपंचाचे वर्चस्वमाजी सरंपच प्रदिप लोढा यांनी पेठ ग्रामपंचायतची एक हाती सत्ता पंचवीस वर्षे हातात ठेवली. गेल्या वर्षी त्यांच्या हातून सत्ता निसटली. मात्र उपसरपंच पदासाठी त्यांचे समर्थक श्यामराव सावळे यांना त्यांनी भाजपच्या दोन सदस्यांच्या सहाय्याने भाजपच्या सत्तेत सहभागी केल्याने त्यांच्या चाणक्य नितीचा अनुभव पुन्हा पहूकरांना आला असून लोढांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.कसबेची पुनरावृत्तीपहूर कसबेत तीन वषार्पूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे बहूमत होते. मात्र एक भाजपचे मत फुटल्याने राष्ट्रवादीचे योगेश भडांगे उपसरपंच झाले आहे. याचीच पुनरावृत्ती पेठ ग्रामपंचायत मध्ये झाल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र पेठ ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे फुटलेले बंडखोर सदस्य दोन कोणते असा प्रश्न समोर आला आहे.निवडणुकीच्या वेळी रामेश्वर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख, शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख, भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, माजी सरंपच प्रदिप लोढा, संदीप बेढे, आर.बी.पाटील, समाधान पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.भाजपाला अंतर्गत गटबाजीचा फटकापेठ ग्रामपंचायतची सत्ता हातात घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून राजकीय रणनीतीचा वापर करीत तत्कालीन सरंपच प्रदिप मोहनलाल लोढा यांच्या ताब्यातून सत्ता हातात घेतली. सरंपचपदी भाजाच्या निता पाटील यांची लोकनियुक्त मधून निवड झाली. मात्र सत्ता हातात घेतल्या पासून अंतर्गत हेवेदावे पाहण्यास मिळाले. प्रत्येक कार्यक्रमांमधून गटबाजी दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्याचा फायदा विरोधी गटाने उचलून भाजपाचे दोन बंडखोर सदस्य आपल्या गळाला लावल्याची चर्चा सुरू आहे.