फोटो क्रमांक ०३ सीटीआर ३०
नशिराबाद : येथील कला शिक्षक श्याम कुमावत व आसोदा (ता.जळगाव) येथील संतोष साळवे यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे ‘राष्ट्रीय कालिदास’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नशिराबाद येथे डी. के. फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सपोनि सचिन कापडणीस होते. माजी सरपंच पंकज महाजन, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड.मोहन देशपांडे, गणेश चव्हाण, चंदू भोळे, नजरूल ईस्लाम, सुदाम धोबी, किशोर पाटील आदी उपस्थित होते. कुमावत व साबळे यांचा डी.के.फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक खाचणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या सोबतच धनराज माळी व स्वप्नील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सचिन मोरे, धीरज सैतवाल, महेश सपकाळे, विशाल खुंटे, डॉ. दीपक लोखंडे, रामू धर्माधिकारी, कल्पेश भावसार, ललित खुंटे, अतिश वाघ, योगेश तारकस, विकी चौधरी, दीपक मुळे, पवन सपकाळे, गणेश सपकाळे, प्रकाश चौधरी, चेतन चौधरी, यश सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार राजेंद्र पाचपांडे यांनी केले.