धरणगाव : येथे युवासेनेतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध करण्यासाठी धरणगाव शिवसेनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत घोषणा देऊन निषेध केला. यावेळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन गटनेते पप्पू भावे, उपजिल्हा संघटक शरद माळी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भगवंत चौधरी महाजन, सुरेश महाजन, जितू धनगर, अहेमद पठाण, माजी नगरसेवक आत्माराम माळी, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, डी. ओ. पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश वाघ, तालुकाप्रमुख चेतन पाटील, संघटक धीरेंद्र पुरभे, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, उपशहरप्रमुख रवींद्र जाधव, सतीश बोरसे, राजू चौधरी, किरण अग्निहोत्री, राहुल रोकडे सोनवणे, सद्दाम अली छोटू चौधरी, वाल्मीक पाटील, भीमराव धनगर, करण वाघरे, गोपाल पाटील, नानू महाजन, आण्णा महाजन, बाळू जाधव नंदलाल महाजन, लक्ष्मण महाजन उपस्थित होते.
240821\img-20210824-wa0019.jpg
पोनि. आंबदास मोरे यांना निवेदन देतांना शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन व पदाधिकारी