शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

सैनिकी वारसा लाभलेले नांद्रा गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 16:43 IST

78 सैनिक करताय भारतमातेची सेवा

ठळक मुद्देजवळपास प्रत्येक घरातील तरुण सैन्यात गावात आहेत 30 माजी सैनिक

आत्माराम गायकवाड । लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा तालुक्यातील नांद्रा हे  3 हजार 500 लोकसंख्येचे गाव असुन गावातील 78 सैनिक देशसेवेसाठी कार्यरत आहेत. तर 30 माजी सैनिक गावात आहेत. त्यामुळे  सैनिकी वारसा लाभलेले नांद्रा या गावाने जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवला आहे.येथील स्वातत्र्य सेनानी लोटन सोनजी सुर्यवंशी , कपुरचंद मुथा, माधवराव लाल सुर्यवंशी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातही भाग घेवुन तुरुंगवासही भोगला आहे.  तेव्हापासून ते आतार्पयत देशभक्तीची परंपरा कायम आहे. येथील जयराम तावडे हे सैन्यात ब्रिग्रेडिअरपदावर कार्यरत होते. तर नाना तावडे हे सुभेदार होते. आजही विविध पदांवर येथील तरुण सैन्य दलात देशसेवा करीत आहेत. नांद्रा गावातील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण सैन्यात कार्यरत आहे. गावाचा कारभार उच्चशिक्षीत महिलेच्या हातीनांद्रा  येथे हरी सोनजी पाटील यांची एक हाती सत्ता होती.त्यांच्या काळात गावातील तंटे गावातच मिटत होते.त्यामुळे गावाने कधीही पोलिस दादा पाहिलेलाच नव्हता.तोच वारसा भाऊराव पाटील यांनी सरपंचपदावर असतांना चालवला. गोपीचंद बाविस्कर , बापुराव बाविस्कर , भिमराव तावडे, सुलाबाई सुर्यवंशी , सुभाष तावडे  या माजी सरपंचांनी आपापल्या परिने गावाला विकासाची दिशा दिली. आता जळगाव शासकीय आय.टि.आय.मध्ये शिक्षक असलेले विश्वंभर सुर्यवंशी यांच्या प}ी हेमलता  सुर्यवंशी या उच्चविद्याविभुषित महिला गावाचा कारभार पाहत आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत आहे.मंदिरावर होतो गावाचा न्याय निवाडानांद्रा येथील ग्राम दैवत महादेव मंदिर हे गावाचे  याय मंदिर म्हणुनच संबोधले जाते. गावातील वाद हे याठिकाणी  मान्यवरांच्या उपस्थितीत मिटविले जातात.  येथे झालेला न्याय निवाडा हा सर्वांनाच मान्य असतो. सन 2015 पासुन ते आज पयर्ंत कुठलाही वाद हा पोलिसात गेला नाही व एकही केस दाखल झालेली नाही.त्यामुळे नांद्रा गावात शांतता व जातीय सलोखा कायम आहे, असे विश्वंभर सुर्यवंशी यांनी  सांगितले.