शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा प्रकरणी एटीएसने जळगाव जिल्ह्यातून पिता-पूत्रास घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 13:27 IST

साकळीच्या संशयितांचे मोबाईल कनेक्शन?

जळगाव : नालासोपारा बॉम्ब प्रकरणात साकळी येथील तिघांना अटक झाल्यानंतर नाशिक एटीएसने बुधवारी चिनावल, ता.रावेर येथील शेख हमीद शेख इब्राहीम (वय ५२) व त्याचा मुलगा या दोन्ही बाप लेकास ताब्यात घेतले आहे. या दोघांचा नेमका काय संबंध याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.नालासोपारा येथील बॉम्ब प्रकरणात एटीएसने याआधी साकळी, ता.यावल येथून किरण निंबादास मराठे (वय ३०, रा.साकळी, ता.यावल) वासुदेव भगवान सूर्यवंशी आणि विजय उर्फ भैय्या उखर्डू लोधी या तिघांना अटक केली होती. या तिघांचे मोबाईल कनेक्शन चिनावल येथील बापलेकांशी असल्याचा संशय आहे. त्यांनी वापरलेले मोबाईल सीम कार्ड या बापलेकांच्या नावावर असल्याची माहिती मिळाल्याचा संशय आहे.दरम्यान, शेख हमीद यांचे कुंभारखेडा रस्त्यावर पठाणवाडीत घर आहे. बांधकामावर ते मजूर म्हणून काम करतात तर मुलगा केळीचा किरकोळ व्यवसाय करतो. या दोघांच्या नावावर असलेल्या मोबाईल सीम कार्डवरुन नालासोपारा, पंढरपूर, सोलापूर, सुरत व गुजरात मधून संपर्क झाल्याचे समोर येत आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या दोघांच्याबाबत स्थानिक यंत्रणेला मात्र कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. सूत्रांच्या मते या दोघांना चौकशी करुन सोडून देण्यात आले तर काही जणांच्या मते त्यांना नाशिक येथे नेण्यात आल्याचे सांगितले जात होते.जळगाव जिल्हा गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर साकळी, चिनावल या प्रकरणावरुन जळगाव जिल्हा गुप्तचर यंत्रणांच्या रडावर असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. आॅगस्ट महिन्यात कोल्हापुर व कर्नाटक येथील एसआयटीच्या पथकाने गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणाशी संबधीत जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका घराची तपासणी केली होती. त्यानंतर नालसोपारा येथील बॉम्ब प्रकरणात साकळी येथील तिघांना अटक केली. आता चिनावल्या दोघांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव