शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

‘माय माझी साक्षात देवी होती, बाप मात्र संतापी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:42 IST

पोलिसांजवळ त्रागा व्यक्त करताना आमची आई तर साक्षात देवी होती, बाप मात्र राक्षस निघाल्याच्या शोकसंवेदना साश्रुनयनांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआॅन द स्पॉट रिपोर्टनेहता येथील वयोवृद्ध पतीने पत्नीचा खून केल्यानंतर विवाहीत मुलाने केला पोलिसांजवळ त्रागा

किरण चौधरीरावेर : तालुक्यातील नेहता येथील वृद्धत्वावर मात करून कोरोनाशी लढा देण्यासाठी आयुषकाढा तयार करून ७३ वर्षीय पतीसह स्वत:चे आयुष्य वाढवण्याची मनीषा बाळगणाऱ्या ६६ वर्षीय पत्नीला किरकोळ वादातून हैवान होऊन पेटलेल्या संतप्त ७३ वर्षीय पतीने चक्क विळ्याने गळ्यावर व तोंडावर वार करून निर्घृृण हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना २१ रोजी पहाटे पाचला घडली. याप्रसंगी मयत वृध्द पती पत्नीच्या दोन्ही विवाहीत पुत्रांनी मात्र जन्मदाता बाप आजन्म मातेचा छळ करून तिचा काळ ठरल्याच्या पोलिसांजवळ त्रागा व्यक्त करताना आमची आई तर साक्षात देवी होती, बाप मात्र राक्षस निघाल्याच्या शोकसंवेदना साश्रुनयनांनी व्यक्त केल्या.कुटुंबाचे संरक्षण व पालनपोषण करणारा जन्मदाता पिता की नऊ महिने उदरात सांभाळून जन्म देवून पोटच्या गोळ्यासारखे माया, ममता व वात्सल्य देणारी जन्मदात्री माता यात श्रेष्ठ कोण? असा समाजमनाला संभ्रमात टाकणारा व अनुत्तरीत ठेवणारा प्रश्न आज तालुक्यातील नेहता येथील मन सुन्न करणाºया तथा काळीज हेलावून टाकणाºया खळबळजनक घटनेतून उपस्थित झाला आहे.तालुक्यातील अटवाडे येथील मूळ रहिवासी असलेले फकिरा तुकाराम वैदकर हे भूमिहीन असल्याने त्यांना सरकारकडून नेहता येथे गत ३५ ते ४० वर्षांपूर्वी तीन एकर जमीन कसायला मिळाली होती. म्हणून फकिरा तुकाराम वैदकर, त्यांच्या पत्नी कमलबाई, मोठी मुलगी, मुलगा रवींद्र व गणेश असा परिवार नेहता येथे स्थलांतरित झाला होता.दोन्ही पती व पत्नीच्या तथा तिन्ही मुलाबाळांनी अथक परिश्रम करून कुटुंबाची गुजराण करीत आपल्या संसाराचा रहाटगाडा ओढला. मुलीचे व दोन्ही मुलांचे लग्न झाले. दोन्ही मुलांच्या संसाराच्या दृष्टीने नवीन प्लॉट भागात त्यांनी टुमदार घरही बांधले.दरम्यान, छोटे कुटुंब सुखी कुटुंब अशी उक्ती असली तरी त्याला या कुटुंबातील परिवार अपवाद होता. फकिरा वैदकर यांना त्यांच्या मनाप्रमाणे रूचकर वा स्वादिष्ट भोजन तथा मनासारखे काम वा वर्तन न केल्यास, ते संतापात पत्नीला व मुलांना लहानपणापासून मारहाण करीत असत. शीघ्रकोपी व तापट स्वभावामुळे त्यांच्याशी सर्वच जण वाद टाळायचे. तरीही पुरूषप्रधान संस्कृतीचा गैरफायदा घेऊन फकिरा वैदकर यांनी पत्नीचा या ना त्या कारणाने छळ तथा मारहाण करून अनेकदा विळ्याने जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याची माहिती दोन्ही मुलांनी पोलिसांंना दिली.घरातील भांडणतंटा टाळण्यासाठी दोन्ही मुलांना विभक्त करून फकिरा वैदकर यांनी आपली शेती स्वत:च्या बळावर कसली. मुलांना तुम्ही तुमच्या बळावर संसाराचा रहाडगाडा हाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दोन्ही मुलांनी हातमजुरीवर आपला संसाराचा रहाडगाडा हाकला. कालांतराने हात पाय थकल्याने त्यांनी दोन्ही मुलांना उक्त्याने शेतजमीन देवून आपली गुजराण केली. दरम्यान, फकिरा वैदकर यांनी दोन्ही मुलांना दीड दीड एकर शेतजमीन वाटून रवींद्र मोठा मुलगा वरच्या मजल्यावर तर खालच्या मजल्यात पुढून धाकटा मुलगा गणेश तर मागील बाजूस स्वत: वृध्द पती पत्नी अशी शेताची व घराची वाटणी करून दिली होती.दोन्ही मुलांचेही वडिलांच्या तापट स्वभावामुळे पटत नसल्याने दोघेही जण आईवडिलांना भोजनाचा डबा देत असत. सणावाराला सर्व परिवार एकत्र येऊनही साजरा करीत असत. मात्र फकिरा यांच्या हेकेखोर स्वभावाचा करूण अंत अखेर पत्नीची निर्दयतेने व क्रूर हत्या करून झाला. आयुष्यभर शेती शिवारातील पीक खुरपून राब राब राबलेल्या वयोवृद्ध ७३ वर्षीय पतीला महादेव मानून त्याच्या सुखी आयुष्यासाठी आयुष काढा विद्युत शेगडीवर पहाटे उकडून पाजणाºया पत्नी कमलबाईची तोंडावर व गळ्यावर किरकोळ सांसारिक वादातून पती फकिरा यांनी विळ्याच्या साह्याने सपासप वार करून निर्दयतेने व क्रूरपणे हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असलेल्या कमलबाई वीज पुरवठा सुरू असलेल्या तप्त विद्युत शेगडीवर कोसळून पडल्याने हाताच्या कामेवर, छातीवर व मांडीवर गंभीर भाजून त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. किंबहुना निर्दयी व क्रूर हत्या करणाºया पती फकिरा यांनी स्वत: छताच्या कडीला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचे प्रायश्चित्त भोगल्याची ही हृदयद्रावक घटना घडली.एवढ्या वयोवृद्ध व्यक्तीने पत्नीचा खून का करावा? याचा उलगडा करताना मात्र मुलांनी बाप संसारात आजन्म मातेला गांजत आला आहे. मारहाण करून करून तर अनेकदा विळ्याने छाटून टाकण्याची धमकी देत होते. अशा आठवणी सांगताना माय आमची साक्षात देवी होती पण बाप मात्र राक्षस निघाल्याच्या कडव्या संवेदना त्यांनी प्रकट केल्या.पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडलेल्या थरारनाट्याची कुणालाही कुणकुण नाही?नेहता या छोट्याशा खेडेगावात शेजारी धाकट्या मुलाचा परिवार, वर मोठा मुलगा, समोरचे व घरालगत दक्षिणेकडे शेजारी असताना म्हाताºया पतीने पत्नीवर तीन-चार वार करून ते रक्ताचे थारोळ्यात विव्हळत असताना तिला तप्त शेगडीचे चटके लागूनही तिने कोणताही आकांत केला नसेल? कोणताही टाहो फोडला नसेल? असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. मात्र वृद्धाची रोजचीच कटकट असेल तर रोज मरे त्याला कोण रडे.. या उक्तीप्रमाणे सोयीस्कर दुर्लक्ष होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मयत कमलबार्इंच्या तोंडावरील व गळ्यावरील तीक्ष्ण हत्याराच्या जखमा खोल असल्या तरी जीव जाईल एवढ्या गंभीरपण नव्हत्या. त्यामुळे विजेच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. दरम्यान, मयत वृध्देचा व्हिसेरा व रक्ताचे नमुने राखून ठेवण्यात आले असून ते न्यायवैद्यक शास्त्राच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.-डॉ.प्रसाद पाटील, वैद्यकीय अधिकारी, रावेर ग्रामीण रुग्णालय, रावेर 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेर