शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

माझ्या मना लागो छंद ... नित्य गोविंद गोविंद... इंजिनिअर झाला जळगाव इस्कॉन शाखेचा प्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:59 IST

चांगला युवक घडविण्यासाठी चैतन्य जीवनदासची धडपड

चुडामण बोरसे जळगाव : उच्च शिक्षण घेऊनही त्याचा ओढा अध्यात्माकडे होता. याच आवडीतून त्याला सवड मिळाली आणि सवडीतून जणू छंद लागला. आणि ‘माझ्या मना लागो छंद .... नित्य गोविंद गोविंद या संत एकनाथ महाराजांच्या अभंगासारखीच अशीच स्थिती या युवकाची झाली आणि आज तो जळगावच्या इस्कॉन शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता मुखोदगत करीत तो आता प्रवचन देत असतो.चेतन भागवत वंजारी (रा. मुक्ताईनगर) वय वर्षे २६ असे या युवकाचे नाव. आता इस्कॉनमध्ये दीक्षा घेतल्यानंतर चैतन्य जीवनदास असे त्याचे नामकरण झाले आहे. चेतन याचा परिवारही इस्कॉनशी संबंधित आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविलेले.. घरची स्थिती जेम- तेम. मग कसे- बसे बारावीपर्यंतचे शिक्षण मुक्ताईनगर येथे झाले. त्यानंतर जळगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. कॉलेजला असताना इस्कॉनच्या संपर्कात तो आला.जीवनात वेगासोबत असावी दिशाजीवनात वेग असून उपयोग नाही तर त्याला योग्य दिशा आणि ध्येय असणे तितकेच महत्त्वाचे आहे, अशी जाणीव त्याला झाली. कॉलेजमध्ये अभ्यासासोबत भगवतगीता, भागवत यासह अनेक पवित्र ग्रंथंचे अध्ययन त्याने सुरू केले. यापूर्वीही त्याने भगवद्गीता वाचली होती.गोविंद हा जनी-वनी...म्हणे एका जनार्दनीमुंबईत काम करीत असला तरी त्याचा आतला आवाज मात्र अध्यात्माचा होता. मुंबई येथे व्यसनाच्या अधीन झालेली तरुण पिढी पहिली, व्यसनासाठी आई -वडीलांना फसविणारे मुले -मुली पाहिल्या. त्यावेळी आपण विकास तर करत आहोत.पण...या पिढीला एक चांगला मनुष्य म्हणून प्रशिक्षित नाही केले तर .... असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. वाढती गुन्हेगारी, घटस्फोट, व्यसनाधिनता पाहून तो खिन्न झाला. आपण दारू पिलेल्या माकडाचा हातात बंदूक देत आहोत, याने शांती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी साधू जीवनाचा स्वीकार करण्याचे त्याने ठरविले आणि याच मागार्साठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला.सुशिक्षित आणि एका चांगल्या ठिकाणी काम करणारे लोक भगवद्गीता आणि अध्यात्माकडे वळत आहेत, याची जाणीव तरुणांना व्हावी, असा उद्देशही यामागे होता. इस्कॉनमध्ये तो गेला आणि त्यांचाच झाला. इस्कॉनच्या अनेक पायऱ्या पार करीत हा युवक जळगाव इस्कॉन शाखेचा आज प्रमुख बनला आहे. दर बुधवारी त्याचा सत्संग तो घेत असतो. चांगला समाज घडविण्यासाठी त्याची धडपड वाखणण्यासारखी आहे. आज चेतन याचा संपूर्ण परिवार श्रीकृष्ण यांची भक्तीत रममाण आहे.त्यामुळे ...गोविंद हा जनी- वनी म्हणे एका जनार्दनी...गीतेत भगवान श्रीकृष्ण यांना नेमके म्हणायचे काय हे कळत नव्हते. पण जोपर्यंत प्रामाणिक वैष्णव भक्त यांची कृपया होत नाही तोपर्यंत भगवद्गीता समजत नाही हे तितकेच खरे. त्यानंतर मुंबई विमानतळावर इलेक्ट्रानिक्स अभियंता म्हणून तो कामाला लागला. तिथे जवळपास तीन वर्षे काम केले. पण तिथे अध्यात्माचा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. यातूनच त्याचा ओढा वाढला आणि तो आज इस्कॉन शाखेचा प्रमुुख बनला आहे.तरुणांनी भगवान श्रीकृष्ण यांची भक्ती करावी , एक सुंदर आनंदी जीवन जगावे तसेच एक व्यसनमुक्त ,सुसंस्कृत आणि गुन्हेगारी मुक्त समाज घडावा अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. इस्कॉनमध्ये असे अनेक तरुण मुले जुळलेलीी आहेत. विशेष म्हणजे ही मुले कॉलेज अध्ययन संपल्यावर मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत आहे.- चैतन्य जीवनदास (प्रमुख, जळगाव इस्कॉन शाखा)

टॅग्स :Jalgaonजळगाव