शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आपुले मरण पाहिले म्या डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 21:40 IST

व्हेंटिलेटरवरून त्याला काढून घेण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश व्हायरल होत होते.

ठळक मुद्दे अमळनेरातील प्रसंगसर्वत्र श्रद्धांजली वाहिली जात होतीतिरडी रचली जात होतीमहिन्यानंतर तो मृत्यूच्या दारातून परतला

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : व्हेंटिलेटरवरून त्याला काढून घेण्यात आले. सोशल मीडियावर त्याचे भावपूर्ण श्रद्धांजलीचे संदेश व्हायरल होत होते. पालिकेत त्याच्या मृत्यूची माहिती देऊन अंत्यसंस्काराची पावतीही फाडली गेली. घरासमोर त्याच्या सरणाची तयारी सुरू होती... अन्‌ दैवी चमत्कार व्हावा त्याप्रमाणे तो जोरजोरात हापकू लागला. पुन्हा दवाखान्यात दाखल केले अन्‌ महिनाभरानंतर तो बरा होऊन घरी परतत आहे. अमळनेरच्या जयवंत ढवळेने जिवंतपणी याच डोळ्यांनी स्वतःचे मरण पाहिले.छायाचित्रकार जयवंत ढवळे नेहमीप्रमाणे ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठला फिरायला गेला. अचानक डोक्याला मार लागला अन्‌ खाली पडला. काय झाले हे समजण्याच्या आत तो बेशुद्ध पडला. अर्ध्या तासानंतर लोकांची गर्दी जमली. डोक्यातून भळाभळा रक्त वाहत असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मेंदूला मार लागल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळ्याला पाठवण्यात आले. तेथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. परिस्थिती बघून डॉक्टरांनी तो बरा होऊ शकत नाही, असे सांगितले. प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व रिपोर्ट मुंबई, पुणे येथील डॉक्टरांना दाखवण्यात आले. त्यांनीही केस हाताबाहेर गेली असल्याचे सांगितले. ४ रोजी परत अमळनेर आणण्याची तयारी सुरू झाली. काही वेळात प्राण जातील असे सांगण्यात आले. रुग्णवाहिकेने अमळनेर आणण्यात आले. इकडे सर्वांचा हसरा विनोदी परखड मित्र गमावला म्हणून सोशल मीडियावर त्याचे श्रद्धांजली संदेश सुरू झाले. पालिकेत त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात येऊन अंत्यसंस्काराची पावती फाडण्यात आली. घरासमोर तिरडी रचण्यात येत होती. अमळनेर येईपर्यंत जयवंतचा श्वास सुरू होता म्हणून अखेर सरळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले अन्‌ काय आश्चर्य! जसे बेडवर टाकले तसा त्याचा श्वास अधिक गतीने सुरू झाला. ज्याच्या मरणाची चर्चास सुरू होती त्याच्यावर पटकन उपचार करा म्हणून भांडणे सुरू झाली. पैसे नसतील तर आम्ही सारे गोळा करू म्हणून अमळनेरकरांनी पुन्हा त्याला धुळे येथे शस्रक्रियेसाठी रवाना केले. जयवंत अधिकच प्रतिसाद देऊ लागल्याने डॉक्टरांच्या आशा पल्लवित झाल्या. अमळनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, मित्रपरिवार यांनी वर्गणी गोळा केली तब्बल साडेतीन लाख रुपये गोळा करून उपचार सुरू झाले आणि महिन्याभरात तो पूर्ण बरा झाल्याने डॉक्टरांनी डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेतला. १ नोव्हेंबर रोजी जयवंत अमळनेरला त्याच्या घरी येत आहे. शेवटी म्हणतात ना  देव तारी त्याला कोण मारी...? 

टॅग्स :SocialसामाजिकAmalnerअमळनेर