ठसे तज्ज्ञांचे व श्वान पथक दाखल
दुपारी बारा वाजता श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी ठसे तज्ज्ञांच्या टीमकडून घरात काही पुरावा मिळतो का? याचा शोध सुरू होता. तर दुसरीकडे घरात मिळालेली जिन्स पँट श्वान पथकाला दाखविल्यानंतर केवळ काही अंतरापर्यंत त्याने मार्ग दाखविला़ तर घरात गुंडाळलेल्या गादीची सुध्दा पोलिसांनी पाहणी केली.
बहिणीचा मृतदेह पाहून भावाचा आक्रोश
घटनेची माहिती दीपक याने चोपडा येथे राहणारे मामा भरत पाटील यांना दिली, त्यांनी लागलीच दुपारी जळगाव गाठले. घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. पोलिसांकडून संपूर्ण पाहणी आणि पंचनामा झाल्यानंतर मृतदेह दुपारी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. त्यानंतर घरमालक रमेश सानप यांच्या फियार्दीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरात आत्महत्तेचा प्रयत्न
प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकर सुरेश हे शुक्रवारी पहाटे घरी परतले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांनी समजूत घातली. त्यानंतर मुलाकडून त्यांनी दोनशे रुपये घेवून चोपड्यातील आईचे घर गाठले़ तेथे संपूर्ण घटना सांगितली. जेवण झाल्यानंतर चोपड्यापासून तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या महादेव मंदिराजवळील शेतात ते निघून गेले. दुसरीकडे एमआयडीसी पोलिसांना सुरेश महाजन यानेच हत्या केल्याचे कळताच त्यांनी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. वडील चोपड्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चोपडा गाठले होते.
शेतातून केली अटक
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद मुदस्सर काझी, गोविंदा पाटील इम्तियाज खान यांचे पथक चोपड्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र, आरोपी हा शेतात लपून असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी मोठे वाहन न नेता, दुचाकींवर पुढचा प्रवास सुरू केला आणि शेत गाठले. त्यानंतर सुरेश महाजन याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देवून संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. तपास पोलीस निरिक्षक विजय शिंदे, अमोल मोरे, रतिलाल पवार, राजेंद्र कांडेलकर करीत आहेत.