अंतुर्लीत वाहनाच्या धडकेने कोल्हा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 15:30 IST
अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेने कोल्हा जखमी अवस्थेत रस्त्या शेजारील शेतात जावून पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात ...
अंतुर्लीत वाहनाच्या धडकेने कोल्हा जखमी
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेने कोल्हा जखमी अवस्थेत रस्त्या शेजारील शेतात जावून पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजच्या सुमारास उघडकीस आली. शेतकरी व वनविभागाच्या सतर्कतेमुळे कोल्ह्याचे प्राण वाचले.रस्ता ओलांडत असताना कोल्ह्याला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने कोल्हा रस्त्याशेजारच्या शेतात जखमी अवस्थेत जाऊन पडला असल्याचे शेतात चक्कर मारण्यासाठी आलेले शेतकरी व भाजपचे तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन यांंच्या निदर्शनास आले. त्यांनी सुनील महाजन व उखर्डू ठोंबरे यांच्या मदतीने जखमी कोल्ह्याला उचलून पाणी पाजले व घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आर.एफ.ओ. अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.टी.पाटील, वनरक्षक एस.एस.वनारसे, वनमजूर अरुण कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे कर्मचारी नामदेव बेलदार यानी जखमी कोल्ह्यावर उपचार करून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. कोल्ह्याला पूर्ण बरा वाटेल तोपर्यंत कर्की येथील नववाटिकेत ठेवण्यात आले आहे.