शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचारी व हॉकर्सची आता हातघाईची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 12:15 IST

जळगाव : शहरातील रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत जात आहे. मनपाकडून कारवाई होत असताना हॉकर्स देखील कारवाईला जुमानता ...

जळगाव : शहरातील रस्त्यांवर अनधिकृत हॉकर्सचा प्रश्न गंभीर होत जात आहे. मनपाकडून कारवाई होत असताना हॉकर्स देखील कारवाईला जुमानता दिसून येत नाही. बुधवारी काही हॉकर्सने मनपाच्या पथकावर दगडफेक केल्यानंतर गुरुवारी मनपाच्या पथकाने हॉकर्सची हातगाडी जप्त न करता हॉकर्ससमोरच तोडून लावली. त्यामुळे आता हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये हातघाईची लढाई सुरु झाली आहे.लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्सिंनग पाडून व्यवसाय करण्याचा सूचना मनपा प्रशासनाकडून भाजीपाला विक्रेत्यांना दिल्या जात आहेत. मात्र, मनपा प्रशासनाच्या या सूचनांचे पालन हॉकर्सकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून दररोज हॉकर्सवर कारवाई केली जात आहे. मात्र, दररोज कारवाई होत असतानाही हॉकर्स देखील मनपा प्रशासनाला आव्हान करत मिळेल त्या जागेवर आपला व्यवसाय थाटत आहेत. मनपाकडून हॉकर्सवर कारवाई करून माल जप्त केला जातो. यावेळी नेहमीच गोंधळ होत असतो. बुधवारी काही विक्रेत्यांनी मनपाच्या पथकावर दगडफेक केल्याने एक कर्मचारी जखमी झाला होता. त्यानंतर गुरुवारी पोलनपेठ, जुना कापड बाजारात कारवाईसाठी मनपा पथक पोहचल्यनंतर हॉकर्सने पळ काढला. ज्या हॉकर्सचा माल पकडण्यात आला. त्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ काही काळ चालल्यानंतर मनपाने एका हॉकर्सची हातगाडी जप्त न करता चौकातच तोडून टाकली. ही कारवाई प्रतिकात्मक स्वरुपाची असल्याचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सांगितले. हॉकर्सला आळा बसावा म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गुरुवारीही १५ ते १६ अनधिकृत हॉकर्सचा माल मनपाने जप्त केला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव