शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे ऐन सणासुदीत धान्य मिळेना-शिवसेना महिला आघाडी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 19:08 IST

‘आधार लिंक’च्या घोळामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. हा तिढा तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतिढा तत्काळ सोडवा अन्यथा तहसीलवर बांगड्या फेको आंदोलन - शिवसेना महिला आघाडीतूर, मका व ज्वारी खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावेतहसीलदारांना दिले निवेदन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : ‘आधार लिंक’च्या घोळामुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना ऐन सणासुदीच्या काळात धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. हा तिढा तत्काळ सोडविण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे तहसील कार्यालयात बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आला आहे.शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही सात ते आठ महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा विभागाच्या चुकीमुळे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसह कुटुंबातील सदस्यांचे आधार लिंक होताना इतर जिल्ह्यातील शिधापत्रिकेस ते लिंक झालेले आहेत, तर स्थानिक शिधापत्रिकेला इतर जिल्ह्यातील व दुसºयाच अनोळखी व्यक्तींचे आधार लिंक झालेले असल्याने सदर शिधापत्रिका धारकांना ई - पॉज मशीनद्वारे धान्य विकत घेताना प्रचंड मनस्ताप होत आहे. याचा गैरफायदा घेत काही दुकानदार सरळ सरळ लाभार्र्थींना धान्य नाकारत आहेत . यामुळे ऐन सनासुदीच्या दिवसात गरीब कुटुंब स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. येत्या १५ दिवसांवर दिवाळीसारखा महत्वाचा सण येवून ठेपला असून, या सणालादेखील सदर शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहतील.तहसिलदारांनी तत्काळ कारवाई करीत आधार लिंकचा प्रश्न सोडवावा अन्यथा शिवसेना महिला आघाडीतर्फे तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांसह येऊन तहसील कार्यालयावर बांगड्या फेको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पना पालवे, उपजिल्हा संघटक सुषमा शिरसाठ, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, उपशहर संघटक विद्या भालशंकर, उपतालुका संघटक उज्वला सोनवणे, उपतालुका संघटक सुनीता तळेले, उपशहर संघटक शारदा भोई, नगरसेविका सविता भलभलेदरम्यान, पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यास तत्काळ तूर, मका व ज्वारी खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी नायब तहसीलदार मिलिंद बाविस्कर यांना मागणीचे निवेदन दिले. या वेळी तालुकाप्रमुख छोटू भोई, अ‍ॅड. मनोहर खैरनार, गोपाळ सोनवणे, गटनेता राजेंद्र हिवराळे, शहरप्रमुख गणेश टोंगे, शेख हारुन मिस्त्री, अमरदीप पाटील, जाफर अली, संतोष माळी, गोकुळ पाटील, दीपक पवार यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर