मुक्ताईनगर (जि.जळगाव) : आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी मुक्ताईनगर येथून श्री मुक्ताबाई पालखी सोहळा सोमवार १८ जून रोजी प्रस्थान होणार आहे. तसेच यावर्षी पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आषाढी वारीमध्ये ‘निर्मल वारी हरित वारी’ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.संत मुक्ताबाई पालखी सोहळा सर्वात जास्त अंतराचा प्रवास असल्याने सर्वात आधी प्रस्थान ठेवतो. राज्यभरातील वारकरी या पालखी सोहळ्यासाठी मुक्ताईनगरमध्ये दाखल होत आहेत. प्रस्थान सोहळा सप्ताहाचे काला कीर्तन स. ७ ते ९ हभप.किशोर महाराज तळवेलकर यांचे होईल, अशी माहिती संस्थानाचे अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी दिली.
मुक्ताबाई पालखी उद्या पंढरपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 04:20 IST