शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

केसावर फुगे आणि खडतर जीवन जगतोय मुकेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 15:57 IST

‘केसावर फुगे’ या खान्देशी गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

ठळक मुद्देसंडे स्पेशल...वस्तुस्थिती‘केसावर फुगे’ खान्देशी गाणे झाले लोकप्रियता मिळवल्यानंतर फुगे हॅश टॅगने मिळवला मोठा ट्रेण्ड

मतीन शेख ।मुक्ताईनगर : ‘केसावर फुगे’ या खान्देशी गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राष्ट्रीय राजकीय नेत्यापासून तर गावपुढाऱ्यापर्यंत उपहासात्मक टीकेसाठी केसावर फुगे बोलणारे धनी अनेक, तर सोशल मीडियावर केसावर फुगे या ‘हॅश टॅग’नेही मोठा ट्रेंड मिळविला, परंतु वास्तविक जीवनात केसावर फुगे देऊन व्यवसाय करणारे कुटुंब आजही खडतर जीवन जगत आहे.केसावर फुगे विकणाºया कुटुंबियांचा हा पारंपरिक व्यवसाय. दिवसभराची गावभर पायपीट करून दोन वेळच्या जेवणाची सोयदेखील होत नाही, हे वास्तव या व्यवसायात असलेल्या मुक्ताईनगर येथील आसलकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर समोर आले.केसांवर फुगेवाले बाबामुकेश रामभाऊ आसलकर हा साठीतला इसम तालुक्यातील अनेक गावात गल्ल्यांमध्ये केसांवर फुगे असा आवाज देताना अधूनमधून दिसतो. लहान मुलांना फुगे आवडतात. या फुगेवाल्या बाबाचा आवाज येताच आई आणि आजीने केस विंचरताना गळलेले आणि घरातील खिडकी आणि कोपºयात जमा करून ठेवलेले केस काढतात आणि आसलकर बाबाकडे देऊन बदल्यात फुगे घेतात. अधिकचे फुगे मिळावे म्हणून बालके मोलभाव करताना दिसतात.स्वातंत्र्यापूर्वीपासून पारंपरिक व्यवसायस्वातंत्र्यपूर्व काळापासून आसलकर कुटुंबाचा केसावर फुगे विक्री हा व्यवसाय आहे. भटके जीवन जगणाºया या कुटुंबात मुकेश आसलकर यांचे आजोबा गुरुदास आसलकर यांच्यापासून त्यांच्या कुटुंंबात केसावर फुगे हा व्यवसाय सुरू झाला. त्यांची ही परंपरा आज वडील रामभाऊ आसलकर, स्वत: मुकेश आसलकर आणि आता त्यांची तीन मुले दीपक, संदीप, चेतन यांच्यासह पत्नी आणि सून असे एकाच कुटुंबातील सात जण दररोज फिरस्ती करून केसांवर फुगे हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत.खडतर जीवनकुटुंबातील एक सदस्य दिवसभर पायपीट करून १०० ग्रॅमच्या घरात केस मिळवतो. त्यामागे १५० ते २०० फुगे दिले जातात. कुटुंंबातील ५ ते ७ सदस्य दररोज भटकंती करतात. पण कधी कधी दोन वेळच्या जेवणाचा खर्चही निघत नाही. किमान ४ ते ५ किलो जमा केले तरच केस मलकापूर व जळगाव येथील घाऊक व्यापारी घेतात. तोपर्यंत उधारीवर किराणा घ्यायचा आणि चार-पाच किलो केस जमा झाल्यावर विकून उधारी फेडायची, असं जगणं सुरू असल्याचे या कुटुंंबाचे म्हणणे आहे.विग आणि गंगावन होतात तयारजमा झालेल्या केसांना प्रतवारीनुसार ३०० ते २००० पर्यंत भाव मिळतो. यात मेंदी केलेले केस ३००, पांढरे केस ५००, सर्वसाधारण ७०० ते १५०० आणि लांब व चांगल्या प्रतीचे २ हजार रुपये किलोप्रमाणे दर मिळतो. या केसांची विग आणि गंगावन बनविणाºया कंपनीत मागणी असते तर बैलांच्या गळ्यात व इतर ठिकाणी वापरण्यात येणाºया केसारीही तयार केले जातात.आम्ही वडिलोपार्जित या व्यवसायात आहे. परंतु चांगले दिवस कधीच आले नाही. कुटुंंबातील ५ ते ७ सदस्य दररोज भटकंती करतात. पण कधी कधी दोन वेळच्या जेवणाचा खर्चही निघत नाही. भटक्यांबाबत शासनाने अनेक योजना केल्याचे म्हणतात, पण आम्हाला कधीच लाभ मिळाला नाही.-मुकेश आसलकर, केसांवर फुगे विक्रेता, मुक्ताईनगरआठ दिवसात साधारण ३० किलो माल जमा होतो.६० ते ७० भटके माल आणतात. केस जमा करणाऱ्यांना दिवसाला १०० रुपये मजुरी निघते. कोलकाता येथील विग कंपनीला आम्ही माल पुरवतो.-संजय बाबूराव आसलकर, केसांचे घाऊक विक्रेते, मलकापूर