शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

ब्रह्मविद्यासंपन्न विनोबा भावेंचे बंधू श्री शिवाजीराव भावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 3:55 PM

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘खान्देशातीेल संतांची मांदियाळी’ या सदरात साहित्यिक प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांचा विशेष लेख.

श्री शिवाजीराव भावे बालपणी शांत व साध्या सोप्या व्यक्तिमत्त्वाच्या वळणाचे नव्हते. लाल मातीत कुस्त्यांच्या दंगलीत ते सामील होत. विनोबा आणि बाळकोबा प्रदीर्घ काळ गांधीजींच्या आश्रमात राहिले. शिवाजीरावही साबरमती आश्रमात राहिले. गांधी आश्रमात रहाणे सोपे नव्हते. गांधीजी सातत्याने नव-नवे प्रयोग करत. त्यांची साधना अवघड होती. शिवाजीरावांना कस्तुरबांच्या हाताखाली कार्य करायची संधी मिळाली. ‘कस्तुरबांच्या कसोटीवर उतरल्याशिवाय तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही’, असे गांधीजी म्हणत असत. स्वच्छता आणि व्यवस्था कस्तुरबांच्या कार्यशैलीची प्रमुख वैशिष्टय़े. मौन मूक सेवा या कामाचे आगळे वैशिष्टय़ होते. शिवाजीराव भांडी घासायचे काम करत. गांधीजींच्या विशेष अनुमतीने शिवाजीराव त्यांच्या कक्षात जाऊन बसत. बापूंच्या जीवनाला जाणून घ्यायचा हा एक मार्ग होता. एकदा गांधीजी व्यग्रतेने आपल्या कक्षात काही शोधत होते. ‘काय शोधताय?’ विचारल्यावर पेन्सिलचा तुकडा हरवलाय! तू पाहिलास?’ असे विचारले असता शिवाजीराव निरुत्तर झाले. ‘तू रोज इथे बसतोस ना? इथल्या सामानाला जपायची तुझी नाही का काही जबाबदारी?’ हे ऐकून शिवाजीराव घाबरले. आता दोघे मिळून पेन्सीलचा तुकडा शोधू लागले. अखेर प्रयत्नांती पेन्सीलचा तुकडा सापडला. शिवाजीरावांना हायसे वाटले. पुढे मग त्यांनी गांधी कक्षाचा निरोप घेतला. शिवाजीरावांनी वर्धा आश्रमात मुस्लिम बंधू नूर अली यांना गीता शिकवली. स्वातंत्र्य लढय़ाच्या धामधुमीत कारावास पत्करला. ग्रामसेवेचा संकल्प मनाशी धरून तीनशेहून अधिक खेडय़ांचा दौरा केला. चक्रवर्ती राजगोपालाचारींसमवेत वर्षभर भारत-भ्रमण केले. सन-1932 ते 1942 या दशकभरच्या काळात महाराष्ट्रभर गीताई प्रचारासाठी पदयात्रा केली. धुळे येथे गांधी तत्त्वज्ञान मंदिराची उभारणी केली. विपुल आणि सकस ग्रंथलेखन केले. बिहार- पंजाबात प्रवास केला. विनोबा त्यांना ‘मजूर’ मानत. बाळकोबा आणि शिवाजीराव दोघांचे जीवन परमार्थ परायण होते. विनोबा म्हणतात की, असे बंधू मला लाभले. मी याबाबत स्वत:ला धन्य समजतो. शिवाजीरावांच्या वा्मयीन अध्ययनाचा गाभा गहन आणि गुह्य आहे. त्यांच्या रचनात्मक कार्य आणि कार्यक्रमाचा अभ्यास एकाचवेळी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, नीती-शास्त्र, मानववंशशास्त्र यासारख्या अनेकानेक विषयांचा आंतरविद्याशाखीय अध्ययनाचा विषयपट ठरावा. या तीन बंधुंमधील समांतर रेषा शोधणे मोठे मनोरम. यांच्यातील विविध प्रवाहांचे घाट न्याहाळणे फारच अप्रूप. शिवाजीराव यांचे जीवन आणि कार्य प्रभावशाली आहे. त्यांनी लिहिलेले ‘विनोबा जीवन दर्शन’ हे आठशेहून अधिक पृष्ठांचे विवेचक असे विनोबा चरित्र आहे. विलक्षण बुद्धिमत्ता, तरल संवेदना, स्वावलंबी जीवनशैली, अखंड ज्ञान-साधना आणि परम तत्त्वाशी जवळीक साधण्याची तितिक्षा शिवाजीरावांचे जीवनविशेष म्हणावे लागेल. ब्रह्मचर्य, गीता, गांधी या प्रस्थान त्रयीवर त्यांनी आपली जीवननौका बांधली. संस्कृतचे गाढे पंडित, सरस्वतीचे वरदपुत्र, वक्तृत्व कलेत पारंगत, संन्यासी असूनही आतिथ्यशील. भगवा न नेसताही अंतरंगी धगधगते वैराग्य जोपासणारे. सत्तास्थानांपासून ठरवून दूर-दूर राहणारे. कुणालाही गंडा न बांधता स्वतंत्र प्रज्ञेने गांधीजींच्या आश्रमीय जीवनव्यवस्थेचे उद्गाते. एकादश व्रतांचे व्रतस्थ पालनकर्ते. मनसा- काया-वचनाने सत्यनारायणाचे उपासक असे शिवाजीराव. त्यांचे जीवन परलोकार्थ होते. ईहलोकी जनता- जनार्दन त्यांनी पूजला. सेवा, त्याग, समर्पण आणि परोपकार या चतु:सूत्रीवर ते ठामपणे उभे ठाकले. ते समरसून जगले. आकाशीच्या बरसत्या धारांसारखे अनिवार, क्षमाशील धरित्रीच्या अंत:कोषासारखे भावश्रीमंत. जलप्रवाहासारखे सैरभैर. विहरत्या वायुसारखे गंधवाही. जळत्या पावकासारखे तेजोद्दीप्त. त्यांच्या जगण्याला पंचमहाभूतांची अशी सुरेख झालर लाभलेली. विनोबा मोठे, बाळकोबा मधले आणि शिवाजीराव धाकटे. महाराष्ट्राला ललामभूत अशा या तीन बंधूंनी जगभर आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा ठसा उमटवला. तिघांमधला स्नेहसंवाद त्यांच्या सहोदर रूपाला अधोरेखित करणारा आहे. अखेरच्या काळातही शिवाजीरावांची दिनचर्या अक्षुण्ण होती. त्यांची प्रार्थना आणि चिंतन अखंड होते. कागदाच्या चिटो:यावर काही मजकूर लिहून ते भेटीला आलेल्यांना देत असत. विनोबांच्या समाधीवर श्रद्धासुमन वहायला जायचा त्यांच्या नियमात कधीच खळ पडला नाही. अंतिम क्षणी मित्रांच्या मदतीने त्यांनी समाधीला अभिवादन केले. अवघ्या 10 मिनिटात त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या थोरल्या बंधूंच्या भेटीसाठी ते निघून गेले. त्यांचे मरण प्रसन्न ठरले.