शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

एकाच घरात खासदार व आमदार मग इतरांनी सतरंज्या उचलायच्या काय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 16:39 IST

बोदवड येथे सभा : अमोल कोल्हे यांचा खडसेंना टोला

बोदवड : एकाच घरात खासदार आणि आमदार मग त्यांच्या कार्यकर्त्यानाही प्रश्न पडलाय की, आम्ही काय फक्त सतरंज्या उचलायच्यात काय? असा टोला राष्टÑवादी कॉँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी गुरूवारी येथे आयोजित जाहीर सभेत भाजपा नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना लगावला.शहरातील गांधी चौकात राष्ट्रवादी कॉँग्रेसने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हितेश पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक, विनोद तराळ, डॉ. उद्धव पाटील, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजू वानखेडे आदी उपस्थित होते.आपल्या भाषणात कोल्हे हे खडसेंचे नाव न घेता पुढे म्हणाले, तुमच्या वयाचा आदर करतो तुम्ही चंद्रकांत पाटील यांना गुंड म्हणतात पण तीस वर्षाचा अत्याचार सहन करून थंड बसण्यापेक्षा हक्कासाठी गुंड बनले तर काय हरकत आहे, यापुढे ज्या पक्षात तुम्हाला जागा नाही तर तुमच्या वारसांना काय जागा मिळणार ? असा सवालही त्यांनी खडसे यांना केला. मतदारांना ते म्हणाले की, तीस वर्षे तुमचं भविष्य या मंडळींनी खडड्यात घातले असून त्यांना आता घरी बसवा.शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना फसवी असून कर्ज माफीसाठी महाराजांचे नाव वापरले पण सरसकट कर्ज माफी झाली नाही. त्यांनी कर्जमाफीसाठी फिरवलं तर तुम्ही त्यांना मतासाठी फिरवा अशी टीकाही कोल्हे यांनी केली.गुजराथ राज्यात सरदार वल्लभभाईंचा स्टॅच्यू चार हजार कोटींचा खर्च करून उभा रहातो पण आमच्या कडे अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभे रहात नाही? इंदू मिलला डॉ. बाबासाहेबांच स्मारक उभे रहात नाही ? केवळ आश्वासने ही मंडळी देते आहे, अशीही टीका त्यांनी केली.राज्यातील समस्येंशी कलम ३७०चा काय संबंध ?परळी येथे नरेंद्र मोदी यांची सभा होती. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या समाधीकडे ते गेले नाहीत, अशी भाजपची नीती असून भाजप केवळ जाहिरात पार्टी आहे अशी टीकाही त्यांनी केली. कलम ३७० चांगले आहे पण त्यासाठी राज्यातील कर्ज माफी मागू नये का, तसेच बोदवड मुक्ताईनगर ला एमआयडीसी नको का असे सांगत राज्याच्या समस्याशी कलम ३७० चा काय संबंध अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी उमेदवार चंद्रकांत पाटील, राजू वानखेडे (सावदा) यांनीही मनोगत व्यक्त केले.