शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

अमळनेर येथील एकावर एमपीडीएची कारवाई; येरवडा तुरुंगात रवानगी

By चुडामण.बोरसे | Updated: August 1, 2023 13:38 IST

सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. 

अमळनेर (जि.जळगाव) : शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली.  त्याची  पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

विशाल दशरथ चौधरी ( वय २७) असे या  आरोपीचे नाव आहे. २०२३ या वर्षात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक  पाच एमपीडीएच्या कारवाई अमळनेरात झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा  शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट , तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. 

विशाल विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई  करूनदेखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हेकाॕ.किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या मदतीने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेकॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी नेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी