रावेर : खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका महिला काँग्रेस कमिटीतर्फे गॅस एजन्सीसमोर घरगुती गॅसच्या तथा इंधन वा खाद्यतेलाच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ लाकडावरील पेटत्या चुलीवर कढईत पाणी टाकून पुर्या तळण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. विविध घोषणांच्या गजरात निदर्शने करून संकल्प दिन साजरा करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील व महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष मनीषा पाचपांडे, जिल्हा उपाध्यक्षा कांताबाई बोरा, अनु. जाती महिला सेलच्या प्रतिभा मोरे, महिला काँग्रेस तालुका सचिव रूपाली परदेशी, तालुका सरचिटणीस रंजना गजरे, तालुका कार्याध्यक्ष प्रीती महाजन व भाग्यश्री पाठक, मीरा मशाने, मनीषा पाटील, सरस्वती महाजन, विमल पाटील, किरण फेगडे, युवा कार्यकर्ता गौतमी पाठक आदी महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.