शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

जानेवारी महिन्यात वीज दरवाढी विरोधात औद्योगिक संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 12:15 IST

वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांचा ईशारा

जळगाव : वीज चोरी आणि भ्रष्टाचार थांबविण्यात महावितरण कंपनी अपयशी ठरली असून त्याचा भूर्दंड व्यावसायिकांना सहन करावा लागत असला तरी कंपनी आपली चूक मान्य करीत नसल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी उद्योजकांच्या बैठकीत केला. त्यामुळे या विरोधात जानेवारी महिन्यात आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा ही त्यांनी दिला.औद्योगिक संघटनांची वाढीव वीज शुल्काविरोधात २९ रोजी सकाळी औद्योगिक वसाहत परिसरात बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. बैठकीस प्रतापराव होगाडे यांच्यासह रवींद्र फालक, मुकुंद माळी उपस्थित होते.औद्योगिक वीजग्राहकांचे दर शेजारील राज्यांच्या तुलनेने ३० ते ३५ टक्के अधिकमार्गदर्शन करताना होगाडे पुढे म्हणाले की, वीज गळती आणि भ्रष्टाचारामुळे प्रती युनिट १ रुपया आकार व्यवसायिकांवर लादला गेला. परिणामी राज्यातील सर्व औद्योगिक वीजग्राहकांचे दर शेजारील राज्यांच्या तुलनेने ३० ते ३५ टक्के अधिक झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक विकासाला खीळ बसणार आहे. शेतकऱ्यांची वीजबिले मुळातच खºया वीज वापराच्या दुप्पट आहेत. एप्रिल २०१५ पर्यंत राज्य शासनाचे जे सवलतीचे दर होते त्या दरांच्या तुलनेने शेतीपंपांचे दर दुप्पट ते अडीचपट तर उपसा सिंचन योजनांचे दर साडेतीन पट आणि घरगुती ग्राहकांचे दर अनेक राज्यांपेक्षा जास्त असल्याचे होगाडे यांनी सांगितले.उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणारसत्तेवर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये जाहीरनामा प्रसिध्द केला व त्यात वीज गळती व वीज खरेदी खर्च कमी करुन स्वस्त वीज देऊ आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता झाली नाही. उलट महावितरणची गळती व भ्रष्टाचार यावर पांघरुण घालण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी आयोगाच्या सप्टेंबर २०१८च्या निर्णयाच्या आधारे राज्यातील २.५ कोटी ग्राहकांवर २० हजार ६५१ कोटी रुपयांची दरवाढ लादली गेल्याचे होगाडे म्हणाले. महावितरण आपली चूक मान्य करत नाही. पॉवर फॅक्टरी पॅनल्टीच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल, असेही होगाडे यांनी या वेळी नमूद केले.४ व ९ जानेवारीलाआंदोलनप्रत्येक जिल्ह्यात बैठक घेवून आमदार व खासदारांना निवेदन देण्यासह आंदोलन केले जाईल. आंदोलनांच्या माध्यमातून आपला असंतोष बाहेर काढा, हा असंतोष मंत्रालयात पोहोचला पाहिजे, असेही आवाहन होगाडेयांनीकेले.४जानेवारीलानाशिकव९जानेवारीला ठाणे येथेआंदोलनकेलेजाणारअसल्याचीहीमाहितीत्यांनीदिली.२०११-१२ पासून वीज गळती कमी दाखविण्यासाठी म्हणजेच पयार्याने चोरी व भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासाठी मीटर नसलेल्या शेतकºयांना जोडभार वाढविणे आणि मीटर असलेल्या शेतकºयांचा वीज वापर प्रत्यक्षात नसला तरीही दरमहा १२५ युनिटस दाखविणे हे प्रकार सुरू असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.२५ फेबु्रवारी रोजी विधानभवनावर उद्योजक धडकणारया संघर्षाचा निकाल लागेपर्यंत चळवळ सुरुच राहणार असून राज्यपातळीवर आंदोलन केले जाईल, अशी माहिती होगाडे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांपर्यंत समस्या पोहचविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. १० जानेवारी रोजी महसूलीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत बैठकीचे आश्वासन दिले आहे, तरी सुध्दा समाधान न झाल्यास २५ फेबु्रवारी रोजी विधानभवनावर राज्यातील उद्योजक धडक देतील, अशी माहिती त्यांनी दिली.या संघटनांची उपस्थितीतया बैठकित लघु उद्योग भारती, जळगाव इंडस्ट्रीज जिल्हा असोसिएशन, पी. व्ही. सी. पाईप मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, जळगाव प्लॅस्टिक रिप्रोसेसर्स असोसिएशन, दालमिल असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅॅग्रीकल्चर, आॅईल मिल असोसिएशन, मॅट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, एम. सेक्टर चॅरिटेबल ट्रस्ट, स्मॉल स्केल इंजिनिअरिंग असोसिएशन, व्ही.सेक्टर असोसिएशन, भा.ज.पा. उद्योग आघाडी, जळगाव इंडस्ट्रीज युथ असोसिएशन, सहकारी औद्योगिक वसाहत लि., जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जळगाव जिल्हा पॅकेज ड्रिंकिंग वॉटर असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव