शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

भाजपासमोर आव्हानांचा डोंगर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 21:26 IST

जनतेला द्यावा लागणार जाब

ठळक मुद्देदेशात, राज्यात सत्ता असूनही शहराचे प्रश्न रखडले गिरीश महाजन करीश्मा दाखवणार का? खडसेंच्या भूमिकेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : देशात, राज्यात सत्ता असूनही शहरातील अनेक प्रश्न राज्यस्तरावर तर काही दिल्लीत प्रलंबित आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजपाला याचा जाब जनतेला द्यावा लागणार आहे. त्यासोबतच भाजपातील अंतर्गत मतभेदाचे आव्हानही पेलावे लागणार आहे.इन्फो-समांतर रस्त्यांची प्रतीक्षाशहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या समांतर रस्त्यांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत भाजपाच्या माजी मंत्री, आमदार, खासदारांनी श्रेय घेत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करीत हा प्रश्न तातडीने सोडविल्याचा आभासही निर्माण केला. डीपीआर मंजुरी केवळ औपचारिकता असल्याचे सांगितले. मात्र डीपीआर पाठवून तीन महिन्यांचा कालावधी उलटला. तरीही डीपीआर मंजुर झालेला नाही. निरपराध नागरिकांचे मात्र महामार्गावरील अपघातात बळी जात आहेत. हा विषय या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे.हुडको कर्जाचा विषय रखडलामनपाने हुडकोकडून घेतलेल्या कर्जाच्या थकबाकीच्या परतफेडीचा विषय डीआरटीत आहे. याबाबत हुडको व मनपा यांची बैठक घेऊन तडजोड घडवून आणण्याची मागणी मनपातील सत्ताधाºयांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे वेळोवेळी केली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पत्रही दिले. मात्र भाजपाच्या मंत्री, आमदार, खासदारांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी रस न घेतल्याने हुडकोने जुनाच मुद्दा पुढे करीत बैठक निष्फळ केली. त्यामुळे हे कर्ज थकबाकीच्या तडजोडीचा विषय रखडला आहे.गाळे कराराचे भिजत घोंगडेमनपा मालकीच्या मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळ्यांच्या प्रिमियम आकारून करार करण्याचा विषय गेल्या ५ वर्षांपासून रखडला आहे. भाजपाच्या काही पुढाºयांनी या विषयात सातत्याने केलेल्या राजकारणामुळे हा विषय चिघळून मनपाला हक्काचे कोट्यवधींचे उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे शहर विकासासाठी निधीची अडचण कायम राहिली आहे. तर दुसरीकडे गाळेधारकांना भाजपाच्या पुढाºयांकडून देण्यात आलेल्या आश्वासनांचीही पूर्तता झालेली नाही. त्यामुळे भाजपाला गाळेधारक व सर्वसामान्य जनता या दोन्हींना उत्तरे द्यावी लागणार आहेत.२५ कोटीच्या खर्चातही आणले अडथळेमुख्यमंत्र्यांनी जळगाव दौºयात शहर विकासासाठी जाहीर केलेल्या २५ कोटीच्या निधीतून करावयाच्या कामांवरूनही राजकारण झाले. चर्चा करून मंजूर झालेल्या याद्यांवरही भाजपाकडून आक्षेप घेण्यात आले. आमदार भोळे यांनी यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. त्यामुळे या निधीतून प्रस्तावित केलेली कामे रद्द करून निधी खर्च करण्यासाठी समिती नेमून कामे ठरविण्यात आली. त्यातही सातत्याने आक्षेप सुरूच राहिले. अखेर ही कामे विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आली. मात्र आधी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची व नंतर मनपा निवडणुकीचीच आचारसंहिता लागल्याने ही कामे या पंचवार्षिकमध्ये होऊ शकली नाहीत. मनपा आधीच आर्थिक अडचणीत असल्याने विकास कामे होत नसल्याचा आरोप करणाºया भाजपाने शासनाकडून मिळालेले २५ कोटी शहराच्या विकासासाठी खर्च होऊच दिले नाहीत. याचाही जाब आता भाजपाला द्यावा लागणार आहे.गिरीश महाजन करीश्मा दाखवणार का?आधी जामनेर व नंतर पालघर नगरपालिका निवडणुकीत करिष्मा घडवून भाजपाची पूर्ण बहुमताने सत्ता आणणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा करीष्मा जळगाव मनपा निवडणुकीत चालणार का? असाही प्रश्न आहे. खाविआ व भाजपा यापूर्वी एकमेकांविरोधात लढले आहेत. असे असताना महाजन यांनी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी युतीबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. लवकरचजागावाटपहोणारअसूनदोन्हीपक्षसोबतराहूननिवडणूकलढणारआहे.भाजपाला मागील निवडणुकीत सर्व ७५ जागांसाठी उमेदवारही मिळले नव्हते.१५नगरसेवकनिवडूनआलेहोते.खडसेंच्या भूमिकेकडे लक्षजलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खाविआ किंवा सेना कोणासोबतही युती करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्रखडसेंनी विरोध केला आहे. त्यामुळे युती झालीच तर खडसेंचीभूमिका काय राहील? याकडेही लक्ष लागले आहे. भाजपाला या अंतर्गत मतभेदांचे आव्हानही पेलावे लागणार आहे.