शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 01:09 IST

भुसावळ , जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून ट्रेलर चालक व ...

ठळक मुद्देसाडेनऊ हजार रुपये रोख मोबाईल हिसकावून आरोपी फरारराष्ट्रीय महामार्गावरील रात्रीची घटनाबाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रेलरला मोटारसायकल आडवी लावून ट्रेलर चालक व किन्नरला मारहाण करून त्याच्याकडून साडेनऊ हजार रुपये रोख व १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेण्यात आल्याची घटना २२ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.ट्रेलर (क्रमांक सीजी-४-एमए-७७२५) हा रात्री दीडच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून नागपूरकडे जात होता. यावेळी ही गाडी न्यू रूप टाइल्स या दुकानासमोर आली. दोन अज्ञात इसमांनी या ट्रेलरसमोर मोटारसायकल आडवी लावली व गाडीत प्रवेश केला. यावेळी दोन्ही अज्ञात व्यक्तींनी चालक अजयकुमार शैलेंद्रकुमार तिवारी (वय ३२, रा.बी.एस.वाय. वरोडा, जि. दुर्ग, छत्तीसगड) यास व त्यांच्यासोबत असलेल्या क्लिनर यास मारहाण केली. यानंतर त्याच्याजवळ खर्चासाठी असलेले साडेनऊ हजार रुपये रोख तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असे एकूण साडेचोवीस हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला.चालक तिवारी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात २३ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांनी भेटी दिल्या. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज ठाकरे करीत आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ